Logo

अल्पवयीन बालिकेवर अत्याचार, दोन आरोपींना१०वर्ष शिक्षा

- 11/02/2023   Saturday   7:36 am
अल्पवयीन बालिकेवर अत्याचार, दोन आरोपींना१०वर्ष शिक्षा

भुसावळ :- येथील मे. सत्र न्यायाधीश 3 आर. एम. जाधव यांनी स्पेशल पोक्सो केस न. 3/2016 मध्ये आरोपी सुरेश सुकदेव कोळी व समाधान प्रल्हाद पाटील रा. पिंपळगाव खुर्द ता. भुसावळ

 यांना दोषी धरून आज दि. 09/02/2023 रोजी 10 वर्ष सक्त मजुरी व रू. 30,000/ प्रत्येकी विविध कलमा खाली दंडाची शिक्षा सुनावली. याकामी सरकार पक्षातर्फे सहा. सरकारी अभयोक्ता अड.विजय खडसे यांनी काम पाहिले.
     आरोपी यांनी पीडित 15 वर्ष अल्पवयीन बालिकेवर धमक्या देऊन तीचेवर वारंवार बलात्कार करून तीस गर्भवती केले होते. याबाबत पीडितेने वरणगाव  पो. स्टे. ला भा. द. वी. कलम 376,323, 506 तसेच POCSO ACT कलम 4,5,6 प्रमाणे  फिर्याद दिली होती. याकामी सरकार पक्षातर्फे एकूण  11 साक्षीदार तपासले असुंन  पिडीत मुलगी,  तिची आई व वैदयकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्व पूर्ण ठरली. आरोपीतर्फे ॲड. राजेश कोळी भुसावळ व ॲड. अकील इस्माईल जळगाव यांनी काम पाहिले.

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: