Logo

कोल्हापूरमधून लेणी अभ्यास दौऱ्याचे आयोजन

- 13/04/2023   Thursday   11:49 am
कोल्हापूरमधून लेणी अभ्यास दौऱ्याचे आयोजन

युवा बौध्द धम्म परिषद, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य तसेच मूर्ती व शिल्प संशोधन संस्था, औरंगाबाद/कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर/औरंगाबाद जिल्हा लेणी अभ्यास दौऱ्याचे आयोजन येत्या २१ ते २५ एप्रिल २०२३ दरम्यान करण्यात आले आहे.

या लेणी अभ्यास दौऱ्याचे उद्देश जागतिक बौद्ध वारसा पाहणे, अभ्यासणे आहे. हा दौरा ना नफा ना तोटा या तत्त्वावर आयोजित करण्यात आला आहे. दौऱ्याची सुरवात दिनांक २१ एप्रिल रोजी रात्री ९.० वाजता कोल्हापूर शहरातून होईल आणि सांगता दिनांक २५ एप्रिल रोजी कोल्हापूरातच होणार आहे. कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव जिल्हयातील ३५ बंधू भगिनींची टीम या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात अनेक लेणी अभ्यासक लेण्यांबाबत माहिती सांगणार आहेत. हे अभ्यासक प्रत्यक्ष लेणी भेटीत गाईड करणार आहेत त्यामुळे लेणी आणि शिल्प यांचा प्राथमिक अभ्यास/उजळणी होईल. लेणी प्रत्यक्ष पाहिली नसेल त्यांना ही उत्तम पर्वणीच आहे. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक वर्षे वास्तव्य असलेली भूमी श्रद्धाभावे पाहता येणार आहे. या अभ्यास दौऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर जवळील लेणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मिलिंद महाविद्यालय, बिबी का मकबरा, पानचक्की, दौलताबाद किल्ला, वेरूळ लेणी, पितळखोरा लेणी, अजिंठा लेणी, घटोत्कच लेणी, लोकूत्तरा महाविहार इत्यादी ठिकाणे पाहता, अभ्यासता येतील. या लेणी अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन युवा बौध्द धम्म परिषद, मुर्ती व शिल्प संशोधन संस्था औरंगाबाद /कोल्हापूर यांनी केले आहे. दौऱ्यात सहभाग आणि नावे  नोंदणीसाठी अभि. बापूसाहेब राजहंस हळदी (से.नि.), जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा मो. 8956723687, प्रा. डाॅ. संतोष भोसले वारणानगर, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य 9011631853, आयु. सतीश भारतवासी कोल्हापूर, राज्य सचिव, महाराष्ट्र राज्य 7972371723 यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: