Logo

ऐनारी लेणी वर बुद्ध पौर्णिमा साजरी...

- 05/05/2023   Wednesday   3:06 pm
ऐनारी लेणी वर बुद्ध पौर्णिमा साजरी...

युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र व कर्नाटक राज्य तथा मूर्ती आणि शिल्प संशोधन संस्था औरंगाबाद शाखा कोल्हापूर यांच्या वतीने येणारी लेणी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. ऐनारी लेणी ही सह्याद्री पर्वतरांगांच्या डोंगर कपारीत माथ्यावर वसलेली आहे. अति धोक्यात आलेल्या या लेणीवर बुद्ध पौर्णिमे रोजी बुद्ध जन्मोत्सव सोहळा साजरा

 करण्यात आला. साधारणता 80 डिग्री मध्ये तीन किलोमीटरचा डोंगर चढून या लेणीपर्यंत जावे लागते. या लेणी थेरवादी परंपरेतील असून या ठिकाणी अर्धवट स्तूप, शून्यागार, अष्टकोनी खांब, बौद्ध भिख्खू यांची ध्यानसाधना आणि अभ्यास करण्याची जागा इत्यादी बौद्ध लेणीची लक्षणे दिसून येतात. अनेक खांबांची पडझड झालेली दिसते तसेच अनेक शून्यगारांच्या भिंती तुटलेल्या अवस्थेत पहायला मिळतात. या लेणी तातडीने संवर्धन करण्याच्या अवस्थेमध्ये आहेत. बुद्ध पौर्णिमेरोजी या लेणीवर दीपोत्सव साजरा करण्यात आला तसेच बुद्ध वंदना घेऊन लेणीची स्वच्छता करण्यात आली. यावेळी युवा बौद्ध धम्म परिषदचे राज्याध्यक्ष प्रा. डॉ. संतोष भोसले तसेच लेणी अभ्यासक आणि संवर्धक संदेश पाटील आणि विजय पाटील उपस्थित होते.

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: