Logo

तो गेला तो कायमचाच..तो परत कधी आलाच नाही !!

- 20/05/2023   Saturday   5:38 am
तो गेला तो कायमचाच..तो परत कधी आलाच नाही !!

20 मे 1991 रोजी राजीव आणि मी सकाळी 7.30 वाजता मतदानाला गेलो. तापमान त्यावेळी सुसह्य होते. राजीवने पांढरा कुर्ता पायजमा घातला होता आणि त्याच्या खांद्यावर तिरंगी उपरणे होते !!

मतदान करून परत आल्यावर राजीवने मला घरी सोडले आणि तो लगेच निघून गेला कारण त्यास पुढच्या दौ-यावर जायचे होते. सायंकाळी परत दिल्लीत येवून तो ओरिसा आणि दक्षिण भारताच्या दौ-यावर जाणार होता कारण दोन दिवसांनी तिथे मतदान होते. परंतु अचानक पणे राजीव पुन्हा घरी आला आणि आम्ही सर्वच जन आश्चर्यचकित  झालो. तो थोड्या वेळासाठीच का असेना पण त्याच्या येण्याने मी आणि प्रियांका खूप आनंदी झालो. त्याने अंघोळ केली आणि राहुलला फोन केला. राहुल त्यावेळी अमेरिकेत शिकत होता, त्याच्याशी फोनवर बोलताना म्हणाला “ I am calling to wish you luck in your exam ,Rahul ! and tell you how happy I am that you will be in home soon ... Its going to be great summer ... I love you Bye bye”

मग राजीवने प्रियांकाला जवळ घेवून , तिचा एक गोड पापा घेतला. त्याला पुन्हा जायचे होते, पण आनंदाची बाब अशी की त्याच्या निवडणुकीच्या दौ-र्यातील हा शेवटचा दौरा  होता. 

"तू थांबू शकणार नाहीस काय आणि या दौऱ्या मुळे निवडणुकीचे परिणाम बदलतील थोडेच!" मी राजीवला म्हणाले

तो माझा हात हातात घेत हसत हसत म्हणाला “ मला माहित आहे ,परंतु सर्व कांही पूर्वीच नियोजन झालेले आहे.. असे काय करतेस अगदी शेवटचा प्रयत्न देखील आपल्याला अधिक यश घेऊन येईल बघ.. आणि केवळ दोन दिवसांचा प्रश्न आहे आपण पुन्हा एकत्रितच असणार आहोत”

त्याने हसत हसत गुड बाय म्हटले आणि माझा निरोप घेतला.पडद्याच्या फटीतून तो दिसेनासा होईपर्यंत मी त्याच्या कडे पाहत उभी होते. 
परंतु तो कधीच परतला नाही, तो गेला कायमचाच" 

सोनिया गांधी  
'राजीव'
साऊथ एशिया बुक्स, 
नवी दिल्ली,1992 
पान क्र. 14 आणि 15

देश के 'राजीव' को सादर नमन!❣️🙏🏻

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: