Logo

विद्यार्थ्यांना उपदेश देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात......

- 15/06/2022   Wednesday   7:15 am
विद्यार्थ्यांना उपदेश देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात......

मिलिंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उपदेश देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात......

विद्यार्थ्यांच्या भावी जीवनाची उभारणी विद्यापीठातच होत असते तो राष्ट्राचा आदर्श नागरिक होणार की त्याचे जीवन विफल होणार हेही शिक्षणक्रम ठरविणार असल्यामुळे विद्यापीठाच्या प्रत्येक हालचालीवर विद्यार्थ्यांचे कटाक्षाने लक्ष असले पाहिजे.

     मानवी शिक्षणातील वैचारिक व नैतिक मूल्य कधीच स्थिर राहिलेली नाही. ती कालमानाप्रमाणे बदलत राहतात नुसती बदलतच नाही तर प्रगत होत जातात .भारतीय विद्यार्थ्यांनी या नव्या नव्या निर्माण होणाऱ्या जीवनमूल्यांची दखल घेतली पाहिजे .आणि आपणही ती आचरणात आणण्यास सिद्ध राहिले पाहिजे .हे नवे तंत्रज्ञान आपल्या विद्यादायी संस्था आपल्या शिक्षणक्रमात घालतात की नाही याकडेही लक्ष घातले पाहिजे.

    विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि वैचारिक पातळी खाली रोडावत चाललेली आहे. भूतकाळातील मानवी प्रज्ञा सीअशी तुलनाच होऊ शकत नाही .ही बौद्धिक पातळी का खाली घसरली याचा विद्यार्थ्यांनी विचार करणे आवश्यक आहे .आणि या परागतीचे कारण अगदी स्पष्ट आहे आजचा विद्यार्थी वर्ग  भूतकालीन प्रज्ञावंत व प्रतिभावंत  यांचा तत्त्वज्ञान व वाड्मय अभ्यास मन लावून करत नाही.
   उलटपक्षी आजचा विद्यार्थी वर्ग फुटबॉल क्रिकेट व पोकळ राजकारणात दंग असतो .विद्यार्जन याला फार मोठा अर्थ आहे आपले प्राचीन गुरुकुले एकांतात विद्या शिकवीत असत रानावनातून ही विद्यापीठे प्रस्थापित झाली होती त्याचे मुख्य कारण असे की विद्येच्या अभ्यासाने भावी  नवी दृष्टी प्राप्त व्हावी आणि ह्या दृष्टीतून त्यांनी खऱ्या जीवनमूल्यांचा शोध व बोध घ्यावा .पण आजचे विद्यार्थी त्याच्यावर राजकारणाच्या फंदात दिव्य दृष्टी प्राप्त करून घेतच नाहीत.
ब्रेकन बनतो knowledge is power  ज्ञान ही महान शक्ती आहे. विद्यार्थी वर्गाला जर या ज्ञानाची कास धरून आपल्या देशाचा विकास आणि उद्धार करून घ्यावयाचा असेल तर त्यांनी विद्यापीठाच्या कारभारात जरूर लक्ष घालून आपल्या हक्कासाठी सतत झटत राहिले पाहिजे.

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: