Logo
सुविचार

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरक विचार

(१) तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही. (२) आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका. (३) स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा ! (४) लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’. (५) शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे. (६) लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे. (७) मी नदीच्या प्रवाहालाच वळवणा-या भक्कम खडकासारख आहे. (८) मी संघर्ष करून अस्पृश्यात जाज्वल स्वाभीमान निर्माण केला

सुविचार

आयुष्यात एखाद्या व्यक्तीवर इतका विश्वास ठेवा कि ती व्यक्ती तुमच्याशी जेव्हा विश्वासघात करेल तेव्हा स्वतःच्याच नजरेत पडेल.