Logo

नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे कि शुभांगी पाटील ?

- 30/01/2023   Monday   9:17 am
नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे कि शुभांगी पाटील ?

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा एकूण पाच मतदारसंघांतील निवडणुकीचे मतदान आज, सोमवारी होत आहे. भाजपने विदर्भ, मराठवाड्यातील उमेदवारांसाठी प्रयत्नांची शर्थ सुरू केली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसमधील साठीमारीच्या राजकारणामुळे रंगत आली आहे. नाशिकचे मावळते आ. डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसचे तिकीट नाकारून त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा दिला. या मतदारसंघात भाजपने अधिकृत उमेदवार दिलेला नाही. तर, शेवटच्या क्षणी शुभांगी पाटील यांच्या अपक्ष उमेदवा

नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपने अद्याप कोणालाही अधिकृत जाहीर पाठिंबा दिला नसला तरी अहमदनगर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी तांबे यांचा प्रचार सुरू केल्याचे भाजपच्या विखे गटातून बोलले जाते. दरम्यान, या पाचही मतदारसंघांतील मतमोजणी येत्या गुरुवारी म्हणजे २ फेब्रुवारी रोजी होणार आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले.

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपने अधिकृतरित्या पाठिंबा जाहीर केलेला नाही; मात्र, नगर जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या स्टेटसद्वारे तांबे यांना पाठिंबा असल्याचे रविवारी सकाळी सूचित केले. तर, आमचे कार्यकर्ते तांबे यांना पाठिंबा देत आहेत. हा निर्णय पक्षाचा नसून स्थानिक कार्यकर्त्यांच्या पातळीवर आहे, असे भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: