Logo

ही कंपनी 200 नवीन नोकऱ्या देणार! गुड न्युज.

- 22/02/2021   Monday   3:57 pm
ही कंपनी 200 नवीन नोकऱ्या देणार! गुड न्युज.

मामाअर्थ ब्रांड (Mamaearth Products) या नावाने वैयक्तिक सौंदर्य प्रसाधनांची उत्पादने विकणारी होनसा कन्झ्युमर प्रायव्हेट लिमिटेड (एचसीपीएल) ही कंपनी 200 नव्या नोकऱ्या देणार आहे.

नवी दिल्लीः मामाअर्थ ब्रांड (Mamaearth Products) या नावाने वैयक्तिक सौंदर्य प्रसाधनांची उत्पादने विकणारी होनसा कन्झ्युमर प्रायव्हेट लिमिटेड (एचसीपीएल) ही कंपनी 200 नव्या नोकऱ्या देणार आहे. यंदा 200 लोकांची या कंपनीत भरती करण्यात येणार आहे. कंपनीने म्हटले आहे की टियर-1 आणि टियर -2 शहरांमधील उत्पादनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झालीय आणि ऑनलाईन व्यवसायात वेगाने वाढ झालीय. एचसीपीएलने सांगितले की, यंदा त्यांचे उत्पन्न वाढून 500 कोटींपेक्षा जास्त झाले आणि नजीकच्या काळात ते दुप्पट होण्याची शक्यता आहे.

 चार वर्षांत 500 कोटींची उलाढाल:

कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण अलघ म्हणाले, “आम्ही आता 300 लोक आहोत आणि या वर्षाच्या अखेरीस आम्ही 500 लोक होऊ.” यापैकी 100 लोक ऑफलाईन रिटेल टीमचा भाग असतील तर उर्वरित ग्रोथ टीम, डीटीओएस टीम, ग्राहक सेवा, मार्केटिंग टीम आणि इतर असतील."कंपनीने चार वर्षांत 500 कोटींची उलाढाल केली असल्याचे ते म्हणाले. कंपनीनं आता 1000 कोटी रुपये कमाईचे उद्दिष्ट ठेवले आहे.

7.3 टक्के सरासरी वाढ :

यंदा जॉबच्या आघाडीवर एक चांगली बातमी येत आहे. वेतनवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. कोरोना साथीच्या नंतर व्यवसाय हालचालींत अपेक्षेपेक्षा वेगवान सुधारणा आणि ग्राहकांचा आत्मविश्वास वाढल्यामुळे कंपन्या यंदा त्यांचे पगार वाढवू शकतात. एका फर्मने म्हटले आहे की, यंदा तुमच्या सरासरी पगारामध्ये 7.3 टक्के वाढ होऊ शकते. हे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत चांगले आहे.यंदा पगाराची सरासरी वाढ 2020 मध्ये 4.4 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, परंतु 2019 मध्ये 8.6 टक्क्यांपेक्षा कमी असेल. यंदा सर्वेक्षणात भाग घेतलेल्या 92 टक्के कंपन्यांनी पगारवाढ झाल्याचे सांगितले, तर मागील वर्षी केवळ 60 टक्के लोकांनी असे म्हटले आहे. 20 टक्के कंपन्यांनी यंदा दोन आकडी पगाराची योजना बनवली आहे, तर 2020 मधील तुलनेत केवळ 12 टक्के होती. 

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: