Logo

' तहाची कविता '- पँथर नामदेव ढसाळ

- 12/11/2021   Friday   6:43 am
    ' तहाची कविता '- पँथर नामदेव ढसाळ

महाकवी नामदेव ढसाळ यांची समाजस्थिती विषद करणारी एक कविता...

व्हा, रे ..आता शहाणे 
शोधू नका ' बहाणे..
आपलीच ' लोक 'हरली
आपल्यातल्या ' तहा ' ने...!

आपल्याच ' बहाद्दराने
केलिया 'आपली ' दैना
आपल्या 'लोकांविरोधी
आपलीच ' भिम सैना....!

आपल्यातूनी' पळाला
शत्रूस ..तो ' मिळाला..
देई ऊलट ..आरोळी
' तुम्हा ' भीमच' ना कळाला...!"

आपल्याच ' माणसाचं
चाले ' निराळं ' डोकं
आपल्याला' पाडणारी
आपली 'खट्याळ 'लोकं..!"

अकलेचा 'आलेख 'आमच्या
कधीही सरळ' ना "गेला
बापाच्या.. 'विरोधात
मुलगाच 'ऊभा' केला...!"

परक्या 'घरात 'सत्ता
आम्हीच 'देत' गेलो
आपल्याच समाजाची
' मज्जाच ' घेत गेलो...!"

सतराशे' साठ 'आम्ही
अमुक  'टमुक' गटाचे '
'कसू -कसून ' आटे
गेलेत.. रे..नटाचे....!"

दोरी'  जरी' जळाली
तरी ' पिळ ' जात नाही
टिकाविना ..रिकामा
इथे ' ईळ 'जात नाही..!"

सोडून द्या ते 'पक्ष'
सोडा मनाचा' हट्ट'
बांधा एकीची 'मुठ'
आवळूनी घ्या रे ' घट्ट..

कळते बघा आम्हाला,
वळत ..कसे रे नाही...?
त्यांना दिव्याची "गाडी
तुम्हीच का ' पायी पायी...?"

आपलेच लोक झाले
आपलेच हाड ' वैरी..
झाडून आपल्यावरती
आपल्याच 'पाच" फैरी...!"

आपलेच ' गार ' केले
आपल्याच माणसाने
गाऊन पुन्हा आपल्याच
पराभवाचे'' गाणे...!"

- पँथर नामदेव ढसाळ

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: