Logo

... महामानवा...- (कवि जगन्नाथ खराटे )

- 13/04/2021   Tuesday   9:06 am
 ... महामानवा...-  (कवि जगन्नाथ खराटे )

अवनीवर ह्या पारतंत्र्याचे ते- घोर तिमिर दाटले, वाट दिसेना जिकडेतिकडे - अज्ञानाचे वादळ ते सुटले, ऊगवला तेव्हा आकाशी तो-

तेजःपुंज ज्ञानसुर्य  नवा,
प्रणाम तूजला सदैव माझा-
धरतीवरच्या विश्व महामानवा..
धरतीवरच्या विश्व महामानवा...

त्रस्त जाहली जनता सारी-
जूलुमांच्या त्या बेड्यनी..
जो तो पराधीन होता ते्व्हा-
वाली न ऊरला कोणी...
देशभक्तांची ती छळवादाची-
भिषण करुण कहाणी...
अकस्मात तो नियतिलाही-गवसला जगतोद्धाराचा मार्ग नवा.

धन्य माऊली  रमाई तीने-
जगतोद्धारक पुत्र जगा दिधला..
अनंत जन्माचे पांग फेडुनी-
ध्वज किर्तीचा गगनी फडकला..
दुर करुनिय दुःख दीनजनांचे-
जगतोद्धारक खरा ठरला..
भेदाभेद ते दुर सारुनी ह्या-
जगास दिधला समतेचा मंत्र नवा..

पंचशिलाचे  तत्वा देवुनी-
जगांस महाबोधी बनवले...
बंधुभाव अन् ज्ञान समतेचे--
ते जगकल्याणा दिधले... कणाकणाने ज्ञान वेचूनिया-
जनतेचे त्या, अज्ञाना घालविले...
शिल्पकार तो घटनेचा, मानव अन् देवामधल्या चैतन्याचा दुवा....   
प्रणाम तुजला धरतिवरच्या-
             विश्व महामानवा...
              विश्व महामानवा....
 आयु.जगन्नाथ खराटे ...ठाणे..
मो क्रमांक..8652629068..

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: