Logo

जगत जगत जगताना - प्रा. डॉ. आनंदी कांबळे

- 09/04/2021   Friday   5:45 pm
जगत जगत जगताना -  प्रा. डॉ. आनंदी कांबळे

जगत जगत जगताना जगले जीवन सारे अर्धे सरले अर्धे उरले थोडे आधे अधुरे

देव केला, धर्म केला, केला सारा बाजार
जगण्याचे व्यवहार राखता राखता मी मात्र बेजार

हे काय म्हणतील, ते काय म्हणतील याचाच केला विचार 
त्यासवे काही गोष्टी जगण्यातल्या केल्या हद्दपार

हसले नाही, खिदळले नाही, नाही मिरवला तोरा
म्हणून जगण्यातला काहीसा भाग तसाच राहिला कोरा

जात आडवी, धर्म आडवा, आडवे आले लिंग
जगताना पदोपदी दिसले समाजाचे वेगळेच भिंग

रंगात तोललं, गरिबीत तोललं, तोललं माझ्या स्वभावात
पण कुणा ना कळे तव काय धमक माझ्या नावात

दुःख झेललं, परवड झेलली, झेलले शिव्याशाप
आताशा कुठे त्यांचीच पडते माझ्यावर शाबासकीची थाप

सुख मिळालं, पदवी मिळाली, मिळाली नवीन नाती
तोंडात बोट घालुनी बोलती आता सगळे अवती - भवती

पायी चालते, हवेत उडते,  घेते उंच भरारी
शून्यातून अवतरलेली मीच आहे सबला नारी

                              प्रा. डॉ. आनंदी सदाशिव कांबळे
                              इंग्रजी विभाग,
                              देवचंद कॉलेज, अर्जुननगर
                              ता. कागल जि. कोल्हापूर 
                              9036585836

1 Comments

  • M

    So nice

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: