Logo

नारद, इंद्रदेव आणि जासूसी

- 22/07/2021   Thursday   2:13 pm
नारद, इंद्रदेव आणि जासूसी

ज्ञानेश वाकुडकर

नारद म्हणाले इंद्रदेवा
आतातरी ध्यानात ठेवा
जासूसी करता जेव्हा तेव्हा
असले धंदे बरे नाही !!

एवढी सत्ता तुमच्या हाती
तरीही झोप येईना राती 
कशास खाता एवढी माती
अप्सरांना व्हॉट्स ॲप का करता ?

जर का नियत असेल साफ 
शंभर गुन्हे होतात माफ 
तुमच्या मनात एवढे पाप
कुठल्या शाखेत शिकला हो ?

बायकांची जासुसी गोष्ट न्यारी
त्यातील तुमचा अनुभव भारी
तिकडच्या सारखी हरामखोरी
इकडे नाही चालायची !!

म्हणून म्हणतो देवा इंद्रा 
तुमचाच बंधू राज कुंद्रा
भानगडी केल्यात पाचशे पंधरा 
शेवटी अंदर गेला ना ?

जनतेला गृहीत धरू नये 
झेपत नसेल ते करू नये
कुत्र्याच्या मौतीने मरू नये
हिटलर पासून शिका जरा !!

बेवकुफ आहेत तुमचे चेले 
ओबीसी..ओबीसी सुरू केले
दिल्ली बोर्डरवर शेतकरी मेले
ते ओबीसी नव्हते का ?

गंगेच्या पाण्यावर तरंगली प्रेते
तुमचे सरकार कुठे होते
सोबत एवढे भंगार नेते
देश ऐसा चालतो का ?

दिवे विझवा, थाळ्या बडवा
कोण सल्ले देतो भडवा ? 
चागलं वागा, इतिहास घडवा..
थोडं आमचंही ऐका हो !!

स्वर्गाची हालत नाही बरी 
धुनी भांडी करतात घरोघरी
ऐसी पाळी रंभा - मेनके वरी
तुमच्यामुळे आली हो !

जेव्हा स्वतःला अक्कल नाही
इतरांचा सल्ला घ्यावा भाई
त्यालाच म्हणती लोकशाही
तुम्हाला अपमान वाटतो !

असला मूर्खपणा पुरे झाला
नुसता वैताग येतो साला
लोक जोडे मारती आम्हाला 
तुम्ही सोडली लाज लज्जा !!

असले धंदे सोडा गुरू 
तुमच्या सोबत आम्हीही मरू
योगींच्या काड्या जाहल्या सुरू
टायअप झाले नागपूरशी !!
-
ज्ञानेश वाकुडकर
नागपूर.. 9822278988

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: