Logo

"नैसर्गिक आपत्तीसाठी "मानवंच" कारणीभूत - जगन्नाथ खराटे

- 30/07/2021   Friday   10:19 am
"नैसर्गिक आपत्तीसाठी "मानवंच" कारणीभूत - जगन्नाथ खराटे

खरं म्हणजे, ईश्वरीशक्तीने स्रुष्टीस्रुजनाच्या सुरुवातीलांच पंचमहाभूताच्या सहकार्याने निसर्गाची निर्मिती केली,अन् नंतर सुक्ष्म जिवसजिवांची निर्मितीकेली कारण निसर्ग म्हणजेच जिव, संजिवाच्या भरणपोषणाची व्यवस्था होती.जिव हा ईश्वराचा लाडका अंश असल्याने मुलांची काळजी बापाला असते ह्या न्यायाने निसर्गातल्या व्रुक्ष,वेली, अन्न धान्य

अन्नधान्य,किंबहुना सर्वं आयुवर्धक अन्नधान्य आधिंच निर्माण झालं अन् नंतर क्रमशः जीवसृष्टीची उत्पत्ती झाली. 
निसर्ग म्हणजे काय हे आपणास माहिती आहे..प्रुथ्वी, आप, तेज, वायु, आकाश हे पाच तत्वे म्हणजे निसर्गाचा पाया.ह्या सर्व तत्वानांच निसर्ग म्हटलं जातं. ही तत्वे एका विशिष्ट नियमांनुसार आपलं काम अव्याहतपणे करीत असतांत हे आपण पाहतोंच.
१)प्रुथ्वी‌‌, म्हणजे जमीन ,अन ही प्रुथ्वी स्वताभोवती व सुर्याभोवती फिरत असते.प्रुथ्वी कशा प्रकारे बनली आहे हे सर्वांना माहीत आहेच.दगड, माती विविध धातु, खणीजे, ह्यांच्यापासुन‌ प्रुथ्वी बनली आहे. हिंच सर्व सुक्ष्मचेतन अचेतन जिवांची ही जननी यह आहे. अन,तिचं अव्याहत  फिरनं‌ हे स्रुष्टीसाठी अत्यंत आवश्यक आहे..तसंच तिचं सतत घर्षण होत असते,अन् प्रथ्विच्या पोटातील प्रचंड उष्णतेमुळे लाव्हा रस बाहेर येवुन त्या लाव्हा रसांचे दगडांचे डोंगर बनले. अन् त्या डोंगरांच्या घर्षणामुळे विविध खणीजद्रव्यामुळे  माती बनली व अन्नधान्या पिकवण्यासाठी उपयुक्त ठरली..
२)आप, म्हणजे जल.. किंवा पाणी.ह्या प्रुथ्वीवर ७१टक्के पाणी आहे.,पाणी कसं बनलं?.प्रथ्वी भोवती विविध प्रकारचे वायु आहे
ह्या वायु मधील आक्सिजन व
हैड्रोजन ह्यांच्या संयोगाने पाणी तयार होते.हे‌ विज्ञानाने सिद्ध केलं. प्रुथ्वीवरिल‌ पाणी ह्यांच प्रक्रियेतुन निर्माण झालं अन, समुद्र तयार झाला.  विविध खणीजद्रव्यामुळे समुद्राचं पाणी खारट झालं.जेव्हा सुर्याच्या प्रचंड उष्णतेमुळे पाण्याची वाफ होऊन वर जाते अन् वर साचुन ढग तयार होतात.व तेव्हा त्यातील खणिजद्रव्ये कमी होऊन पावसा वाटे, बारीक पावसाच्या थेबावाटे गोडे पाणी होवुन जमिनीवर पडते नद्यानाल्यांतुन वाहते वअन्नधान्य पिकतं अन् स्रुष्टिची तहान भागवून जिवसजिवांचे पोषन करते.
३)तेज.. म्हणजे अग्नी.. किंबहुना उष्णता.. उष्णतेची निर्मिती ही सुर्याद्वारे झाली किंबहुना सुर्य हांच अग्नीदाता.. दाहकता गुण..अन प्रकाशाचा जनक.. किंबहुना सुर्या शिवाय सारी स्रुष्टी अंधकारमय किंवा अचेतन  ठरली असती.. अग्नी शक्ती मुळेच जिवसजीवां चैतन्य सळसळते.. किंबहुना अग्नी तत्व जिवनाचा मुलाधार आहे..
४) वायु.. म्हणजे हवा.. हवेची उत्पत्ती ही अनंत ईश्र्वरी शक्ती द्वारे झाली अध्यात्म सांगते.. प्राणवायू, कार्बन डाय ऑक्साईड, होड्रोजन, हेलियम, इ  प्रकारे वायु तत्व हे प्रुथ्विभोवती आहे.अन त्यामुळे स्रुष्टीस्रुजन सुरळीत सुरू आहे.वैज्ञानिकांनी संशोधनामुळे विविध धातु वर प्रक्रिया करुन प्राणवायू, कार्बन डाय ऑक्साईड इ वायुंची निर्मितीमध्ये काही प्रमाणात यश आले आहे.पन् ते पुरेसे नाही.. ह्या वायुंचं आवरण प्रुथ्विभोवती आहे.त्यामुळे आफन‌सारे सजिवेतर प्राणी जिवित आहोत..
५) आकाश.. पोकळी.. आपन हे नेहमीच पाहतो.. आकाश म्हणजे अनंत पोकळी.. किंबहुना सर्व जीवसृष्टीचे चलनवलन करण्यासाठी एक आवश्यक भाग..ह्या पोकळीत अनंत जीवसजीव सामावले जातात तरीही ती सर्वत्र व्यापुन ऊरली आहे..  
वरील पंचमहाभूतांना निसर्ग म्हटले जाते. सजीवेतर प्राणी वनस्पती जड चेतन ह्यासाठी पंचमहाभूते अत्यंत आवश्यक आहे. पन् चैतन्यमयी स्रुष्टी ह्या निसर्गाशिवाय अधुरी आहे..
स्रुष्टीचं स्रूजनकार्य पंचमहाभुतां मधुंनंच यशश्वी होतं. अन् स्रुष्टि
चक्रं सुरळीत सुरू राहते.त्यासाठी  जिवसजिवांंचे सहकार्य अपेक्षित असते. सृष्टीतं सारेच संजीव हे  निसर्गाला निसर्गनियमानुसार अनुसरून वागंतं आले आहे.
पन् ईश्वराचा अत्यंत लाडका पुत्र आधुनिक युगातील मानव, मात्रं ह्यास अपवाद आहे..
 पुर्वीचा आदिमानव हा निसर्गाचा मित्र होता निसर्गाच्या सान्निध्यात अत्यंत सुखी समाधानी जिवन जगत होता..पन् निसर्गातील व्रुक्षसंपदांची वस्रे पांघरंत असे. मिळेल त्या अन्नावर गुजरान करीत असे, निसर्गाला कसलीही इजा पोहोचणार नाही ह्याची काळजी घ्यायचा. पुर्वि घनघोंर जंगले असायची, विपुल पशुपक्षी होते, विविध प्रकारच्या वनस्पती होत्या विविध झाडेझुडपे होती स्वच्छ हवा होती,निर्मळ नद्या अविरत वाहंत होत्या,अन् मनुष्य हा निसर्गातल्या सर्वच जिव
सजिवांचा मित्र होता त्याने निसर्ग नियमांनुसार वागंत होता अन् आनंदाने शतायु आयूष्य जगंत होता.पंचमहाभूतांचे कार्य अगदी सुरळीत होते. 
काळानुसार मनुष्य बदलला. पुर्विचा आदिमानव हा हळूहळू बुद्धिमान होवुन यांत्रिक युगातला आधुनिक मानव बनला..शरीर सुखाच्या गरजा वाढल्या,जिवन शैली बदलली,काळानुसार बदल  आवश्यक आहे पन्, कोणत्याही प्रकारचा सकारात्मक बदल हा जिवनात आनंद निर्माण करतो. अनृ नकारात्मक बदल हा दुःख निर्माण करतो हे मनुष्य पुर्णपणे विसरला. ईतर जिवसजीव सर्वं निसर्गनियमानुसार लागतं आहे. पन् फक्त,मनुष्यप्राणी सुखोलोलुप वृत्तीने मनाला वाटेल तसा वागु लागला.त्यांचे अनिर्बंध वर्तन हे निसर्गाला हानिकारक बनु लागले 
जगलांत आनंदानं झोपडीत राहणारा मानव  काळानुसार हा आलिशान बंगल्यात राहु लागला. 
टोलेजंग ईमारती बांधु लागला.
जागेची कमतरता असल्याने व्रुक्षतोड करुन अनेक जंगलं नष्ट करुन सिमेंटच्या गगनचुंबी इमारती बांधु लागला. निसर्गाचा र्हास करुन,आपल्याच पायावर कुर्हाड मारु लागला्,हळूहळू व्रुक्षसंपदा नष्ट होवून.निसर्गाचा समतोल बिघडला,सुर्याची उष्णता वाढु लागली.व्रुक्षतोडीनं पावसांचा समतोल ढासळला,अवेळीच्या पावसानं कधी अवर्षण तर कधी धुवांधार पर्जन्यवृष्टी होवुन  महापुरांचे थैमान पसरले. व्रुक्षतोडीमुळे जमीनिची धुप थांबली,अन्,पिकांच्या वाढीसाठी नुकसानदायी ठरली.वृक्षतोडीनं जंगले नष्ट झाली.जंगलातील पशुपक्ष्यांच्या जाती नष्ट झाल्या. निसर्गाचं सौंदर्य हरवलं. पिके वेळी अवेळी येवून त्यातील कसं कमी झाला ,सकस अन्नाअभावी रोगराई वाढली,जिवघेणे आजार वाढले, आहारविहार बदलले.अन अनारोग्य वाढले.
 निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मनुष्याने निसर्गाच्या नियमानुसार वागने अत्यावश्यक आहे. पन् मानवाने शारीरिक सुखाच्या हव्यासापोटी निसर्गातील वृक्षसंपददेवर आघात केला अन् सारं तालतंत्र बिघडलं. अवेळी
पावसामुळे अति जलवृस्ष्टी होवुन शहरं जलमय झाली त्याला कारणीभूत मानवंच आहे, लोकसंख्यावाढीनं डोंगर पोखरले गेले पाण्याचे प्रवाह रोखले जाणुन महापुरानं जिवित हानी वित्तहानी ही आपल्याच कर्माची फळं आहे. निसर्गाला दोष देवून काही उपयोग नाही  मानव,,जलप्रदूषन, वायुप्रदूषणास कारणिभुत करुन निसर्गाच्या र्हासांसाठी कारणीभूत ठरला आहे.अन त्यामुळे आपलंच जिवन उद्ध्वस्त करीत आहेत.. अन् दोष निसर्गाला देत आहे ह्यालाच चोराच्या उलट्या बोंबा मृ यावं लागेल... हृयासाठी आपन सर्वांनी व्रुक्षारोपन,. वृक्षसंवर्धन.केलेंच पाहिजे.आपल्य देशातील प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावुन त्याचे संवर्धन केलं तर १३०करोड झाडं बहरून निघतील अन् त्यामुळे निसर्गरक्षण होईल भरपुर पाऊस होईल नद्या भरभरुन वाहतील‌ , शेतात पिके तरारुन येतील,  देश अन्नधान्याने सम्रुद्ध होईल.रोगराई कमी होईल. सूर्याची उष्णता कमी होईल, शुद्ध हवा मिळेल. सर्वंत्र आनंदी आनंद होईल अन् शतायु जिवन जिने शक्य होईल..
प्रुथ्वि,आप, तेज,वायू,आकाश ह्या पंचमहाभूताशी महान शक्तीशाली दैवतांशी सदैव विनम्र असायला हवं.किंबहुना पंचमहाभूतांनी. बनलेला आपला मानव देह  तसेच ईतरही अनंत जड अचेतन देह जर अबाधित ठेवण्यासाठी किंबहुना निसर्गनियमानुसार लागलेच पाहिजे. अन् हे मानवाचे प्रथम कर्तव्य आहे..

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: