Logo

महाराष्ट्र देशा

- 01/05/2021   Saturday   8:20 pm
महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ...

मर्द मराठा मावळा रांगडा गडी  माझ्या महाराष्ट्राची आहे  शान...
रक्तामधल्या कणांकणांमधल्या महाराष्ट्राचा आहे मला अभिमान..

सतंमहतं, इथे जन्मले संस्कृतीचा दिधला मानवतेचा अमुल्य वसा..
मानवतेचे पाईक त्या देशभक्तांचा  पुढे चालवु आम्ही अमुल्य वारसा.

अवजड बेडी अन् अंदमानच्या ते कारागृहीचे दुःखा निर्धाराने लढले,
जनामनाच्या ह्दयसिंहासनी ते, आरुढ होवुन ते स्वातंत्र्यविर ठरले

सहृयाद्रिचा तो नरसिंह प्रजादक्ष ते
हिंदवी स्वराज्य रक्षक शिवभुपती.
अभिमानाने नतमस्तक होवुन त्या चरणावर, गाऊ आनंदाने आरती..

मराठा आमुचा बोल कोतुके अन्, त्रिजगती अन्, अलौकिक ख्याती.
 धन्य माऊली  योगीराज ज्ञानेश्वर ते,जिंकली त्यांनी अम्रताची महती

अजुनही महाराष्ट्र हा कणखर  आमुचा,जरी आपदांनी व्यापला..
परी धैर्या आठवुनी शिवबाच्या त्या काळासंगे सदा पुढे धैर्याने चालला

अंतर्गत ते हितशत्रू जरी महाराष्ट्रा
 सदा जरी पाठीवर  घाव घालती..
क्रुतघ्न त्या नराधमांची एकजुटीने आम्ही फोडुन काढु ती छाती...

मर्द मराठा मावळा रांगडा गडी माझ्या महाराष्ट्राची आहे शान..
 रक्तामधल्या कणांकणांमधल्या महाराष्ट्राचा आहे मला अभिमान..
महाराष्ट्राचा आहे मला अभिमान..

जगन्नाथ खराटे----ठाणे...
८६५२६२९०६८...

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: