Logo

वारसा पाहिजे

- 05/08/2021   Thursday   11:24 am
वारसा पाहिजे

वृत्त- स्त्रग्विणी(गझल)

आसवाची जरा लालसा पाहिजे
 तेज हे झेलण्या वारसा  पाहिजे
  
हा कसा मी मला त्रास देवू सखे 
वेदनेचा तुझा आरसा पाहिजे


धर्म माझा तुझा गोठला हा कसा
मानवी दाह हा थोडसा पाहिजे
  

काळजी वादळाची कशाला हवी
 जीवनी या फुला हादसा पाहिजे
  
मागणे ही तुझे पावसातील रे
कोरडा हा कधीचा घसा पाहिजे

 काम झाले तसे दूर झाले किती  
 ह्या हवेची कशाला दिशा पाहिजे

जाणतो हाच आलाप हे राग मी
रक्त जाळून  माझे ठसा पाहिजे
✍️✍️✍️
विकास भोवते
अमरावती

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: