Logo

"वैखरी अमृतानुभवाची" ग्रंथ प्रकाशन सोहळा - एक अविस्मरणीय संमेलन

- 31/12/2021   Friday   1:03 pm
"वैखरी अमृतानुभवाची" ग्रंथ प्रकाशन सोहळा - एक अविस्मरणीय संमेलन

दिनांक २६ डिसेंबर २०२१ रोजी कोल्हारच्या श्री.भगवतीमातेच्या पवित्र भूमीत,मांडवे गांवी पेटिट ७३ परिवाराचे सहावे संमेलन पार पडले. त्यासाठी मुंबई, पुणे, ठाणा, नासिक, संगमनेर, अकोले, अहमदनगर, औरंगाबाद ,आंबेजोगाई येथून पेटिट७३चे माजी विद्यार्थी जोडीदारांसह आले होते.

कोल्हार येथील प्रथितयश उद्योजक व सेवानिवृत्त अभियंता अशोकजी खर्डे यांच्या प्रायोजकत्वाखाली कोल्हार जवळ मयूर बाग, खर्डे पाटील फार्मवर हे  संमेलन पार पडले.सदर ठिकाण मांडवे गांवी पुर्वीच्या  कै.अण्णासाहेब शिंदे यांच्या शेतीवर आहे.

आजुबाजूला  प्रवरामाईच्या पाण्यावर फुलणारीउसाची शेती.मधोभध बंदीस्त कुंपन असलेले अशोकरावाचे अत्याधुनिक फार्महाऊस,जवळच फिरत असणाऱ्या मोरांचा केकारव ही ऐकू येत होता.

सुरवातीस प्रायोजक अशोकराव, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सीमा खर्डे व निवृत्त सनदी अधिकारी निर्मलकुमार देशमुख यांनी दिप प्रज्वलन करून सुरवात केली. 
त्यानंतर  जमलेल्या सर्वांनी  पेटिट 73 या अक्षरावर ठेवलेल्या मेणबत्या प्रजल्वीत केल्या.

 संमेलनाचे प्रायोजक सौ.सीमा व श्री.अशोकराव खर्डे पा. यांचा सत्कार सौ.राजश्री व अनिल चांडक यांच्या हस्ते फेटा व शाल देऊन करण्यात आला. त्यानंतर पाचव्या संमेलनाचे प्रायोजक देशमुख यांचा सत्कार ऍड.मधुकर गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यानंतर दिपक क्षत्रिय व कोरसमध्ये अनिल चांडक,राजेंद्र फरगडे,सुनिल झिंझाड यांनी 'इतनी शक्ती हमे देना दाता' ही प्रार्थना म्हटली.
त्यानंतर हिरालाल पगडाल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
सुरवातीचे स्वागत यजमान श्री.अशोकराव खर्डे यांनी केले. त्यात त्यांनी कोल्हारच्या भूमीचा इतिहास विदीत केला.
तदनंतर उदघाटक निर्मलकुमार यांनी आपल्या विनोदप्रचूर भाषणाने सर्वांची मने जिंकली.सध्याच्या चालु प्रथा व चालीरिती,अंधश्रध्दा यावर चौफेर फटकेबाजी करून सर्वांना हसते ठेवले.या वयात नियमित आहार,त्यास व्यायामाची जोड देऊन आपले आरोग्य जपण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर वेळ आली 'वैखरी अमृतानुभवाची' या पुस्तकाच्या प्रकाशनाची.या प्रकाशनास अशोकराव खर्डे व त्यांच्या सुविद्य पत्नी,निर्मलचंद्र देशमुख,  मुंबई हायकोर्टाचे  सेवानिवृत्त न्यायमुर्ती श्री.राजेशजी केतकर,पेटिट73 बॅचचे त्यावेळचे जी.एस.किशोर कालडा,त्यावेळच्या टॉपर डॉ.सुनंदा जोर्वेकर या सर्वांना व्यासपिठावर पाचारण करण्यात आले.तसेच संपादकीय मंडळाचे सदस्य देखील होते. त्या सर्वांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

त्यानंतर वैखरीचे संपादक राजेंद्र फरगडे यांनी आपले संपादकीय मनोगत सादर केले.त्यानंतर सहसंपादक अनिल चांडक यांनी सहसंपादकीय मनोगत सादर केले.
त्यानंतर हिरालाल पगडाल यांनी प्रकाशकीय मनोगत केले. त्यात त्यांनी 'वैखरी अमृतानुभवांची' या ग्रंथाची वैशिष्ट्ये सांगून पुढच्या सातव्या संमेलनाचा नारळ नासिकचे श्री.दिपक भुतडा यांनी घेतल्याचे जाहिर केले.
त्यानंतर संपादकीय मंडळातील सदस्यांनी मिळून पेटिट७३च्या सर्व सदस्यांना सपत्निक/पतीसह व्यासपीठावर बोलावून वैखरीचे ग्रंथ प्रदान केले.
तसेच तेथे उपस्थित असलेले कोल्हारचे सुप्रसिद्ध पत्रकार श्री.दादासाहेब कोळसे पाटिल यांचाही सत्कार करण्यात आला. त्यांनी स्वत: संपादन केलेल्या श्री.भगवतीमातेचे महात्म्य व इतिहास या पुस्तकाचे उपस्थित सृजनांना विनामुल्य वितरण केले.तसेच या संमेलनाचे यजमान श्री.अशोकराव व त्यांच्या सुविध्य पत्नी यांनी पुढचे यजमान श्री.दिपकजी व सौ.चंद्रकलाबाई भुतडा यांचा सन्मान केला.

त्यानंतरचा वेळ  खासकरून 'बोल सखी बोल' या  पेटिट७३च्या व्हाट्सअप्प ग्रुप महिलांसाठी होता. त्याचे अँकरिंग सौ.माया मुंगी/देशपांडे यांनी अतिशय सुंदर व ओघवत्या भाषेत केले. त्या सर्वजणी व्यासपीठावर आल्या व त्यांनी संमेलनाच्या संयोजक व  संपादकीय मंडळाचा सपत्निक सत्कार केला.
आंतरराष्ट्रीय गोल्डमेडल मिळाल्याबद्दल श्री. किशोर कालडा यांचाही सत्कार केला गेला.


हा सर्व कार्यक्रम होत असतांना दुपारचे दोन कधी वाजले समजलेच नाही.
त्यानंतर पहिले सत्र संपून भोजनासाठी सुट्टी झाली.
अत्यंत स्वादिष्ट रूचकर मेनु, यजमानांचा आग्रह साऱ्याजणांनी यथेच्छ भोजनावर ताव मारला. मंडपाखाली ठेवलेल्या चक्राकार टेबलाभोवती खुर्च्यावर हसत खेळत भोजन पार पडले.ज्यांची ज्यांची जेवणे झाली ती बाहेर मंडपाखाली गोलाकार करून खुर्च्यात बसून गप्पा मारित होती.कोणी फोटो सेल्फी काढीत होते,तर कोणी शिळोपाच्या गप्पा मारित होते.

त्यानंतर प्रायोजित वेळेपेक्षा खूप उशीरा दूसरे सत्र सुरू झाले. त्यावेळेस लाला मणियार, संपत देशमुख,   ,श्रीकृष्ण गीते, किशोर कालडा यांनी मनोगत व्यक्त केले.सौ.चंद्रकला दीपक भुतडा यांनी  सर्वांना पुढील नासिक संमलेनात येण्याचे आग्रहाचे निमंत्रण डॉ.सौ.दाक्षायणी देशपांडे यांनी अतिशय सुंदर मनोगतात  देहदान या विषयासंबंधी मौल्यवान विचार व फायदे विषद करून सांगितले.

हे सर्व करित असतांना पाच कधी वाजून गेले समजलेच नाही.नियोजित वेळेपेक्षा संमेलन खूपच लांबल्यामुळे ग्रुप ऍडमीन हिरालाल पगडाल यांनी संमेलन संपल्याचे जाहिर केले. 
त्यानंतर सर्वांनी हाय टीसाठी भोजनमंडपात धाव घेतली. रगडापपॅटीस,पाणीपुरी,सँडविच,चहा कॉफीचा आस्वाद घेऊन मंडळी आपापल्या गांवाकडे परतु लागली. जातांना श्री.भगवतीमातेच्या चरणीमाथा ठेवून आपापल्या घरी आनंदाने गेली.

लॉकडाऊनच्या काळामुळे जवळजवळ दिड एक वर्ष लांबलेल्या ,एका अनमोल साहित्यक मुल्य असलेल्याएकोणसत्तरजणांच्या आत्मकथनांनी सजलेल्या ग्रंथाचे प्रकाशनाचा,संपादकिय मंडळाच्या कष्टाचा,यजमान श्री.अशोकराव खर्डे यांच्या आतिथ्यशिल पाहुणचाराचा  वैशिष्ट्यपूर्ण सोहळा संपला.एक अविस्मरणीय आनंददायी दिवस आज पेटिट ७३ परिवाराने अनुभवला, येणाऱ्या सातव्या नासिक संमेलनात भेटण्याचे मनात योजत संपला

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: