Logo

सॉरी यार बळीराजा ! बळीराजा रिटर्न्स.. ~ ज्ञानेश वाकुडकर

- 12/11/2021   Friday   6:31 am
सॉरी यार बळीराजा !  बळीराजा रिटर्न्स.. ~ ज्ञानेश वाकुडकर

सॉरी यार बळीराजा मनापासून सॉरी तुझी गोष्ट आठवली की टेन्शन येते भारी !

कोण, कुठला 'बटू वामन'
भिक मागत आला 
तुही आपलं वेड्यासारखं 
दान दिलंस त्याला !

तुही आमचाच बाप आहेस 
काय बोलायचं म्हणा !
पण.. त्यानं तरी का करावा
एवढा हलकटपणा !

अशी कोणती नीती यार 
असं कसं चालायचं ?
ज्यानं 'दान' दिलं त्यालाच.. 
मातीमधे घालायचं ?

नवा काळ आला आता 
नवी पिढी आली 
तुझी गोष्ट सांगणं म्हणजे 
आमची गोची झाली !

माझा नातू, छोटा 'बळी'
तुझ्या सारखाच भला 
परवा तुझी गोष्ट ऐकून 
झापत म्हणाला मला.. 

'हे जे कथेत घडत आलं
टळायला हवं आबा !
'बटू वामन' 'फ्रॉड' होता 
कळायला हवं आबा ! 

मी असतो तर वचनं वगैरे..
बाजूला सारली असती  
'बटू वामना'ला सरळ मागून
लाथ मारली असती !'
~~~ 
ज्ञानेश वाकुडकर 
नागपूर तेवीस/दहा/चौदा

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: