Logo

स्त्रीवादी विचार

- 02/08/2021   Monday   3:29 pm
स्त्रीवादी विचार

तिच्या कवितेतून समाजाविषयक रूढींवर आवेगाने काही शब्द ओघळले की,ती कविता वाचताना तोही घसरतो...

तेव्हा सावरायला येतात
काही समाजसुधारक बुरखा
धारण केलेले पुरुषीलेखन हात...
अन् मुक्त विचारसरणीच्या नावाखाली
तो करतो शाब्दीक विनयभंग तिच्यासोबत...

त्या फाजील शब्दांंच्या सहानुभूतीने
स्तब्ध होतात तिच्या संवेदना
मनाच्या वैचारिक बांधावर...
अस्फुट, अस्पष्ट विचारांच्या चित्कारात...
मंद,मंद होत जातात तिच्या
समानतेवर आधारित विचारांचे तेज...

आणि ती नंतर फक्त बनून
राहते एक स्त्रीवादी विचार
तिच्या साहित्यातला...
फक्त वाचण्यासाठी...
फक्त संदर्भासाठी...
फक्त बोलण्यासाठी...

प्रा. त्रिशिला साळवे, पिंपळनेर
९११२८५९६६९/८०१०२८३८०३

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: