Logo

VBA व बाळासाहेबांचे पंढरपूर आंदोलन हि मागील ६० वर्षातील एक क्रांतिकारक बाब आहे!

- 18/09/2020   Friday   7:10 pm
VBA व बाळासाहेबांचे पंढरपूर आंदोलन हि मागील ६० वर्षातील एक क्रांतिकारक बाब आहे!

खरेतर मी राजकारणाविषयी लिहिणे बऱ्याच काळ टाळले आहे, VBA व बाळासाहेब यांच्या कालच्या पंढरपूर मंदिर प्रवेश आंदोलनाबद्दल VBA व बाळासाहेबांचे विरोधक राजकारणात धर्म/धम्म घुसवून, तसेच कारण नसताना विचारधारा मध्ये आणून आकसबुद्धीने विरोध करत आहेत.. खरे पाहता राजकारणात धर्म मध्ये आणणे म्हणजेच संपूर्णतः असंगत आहे.. तरीही अशा पद्धतीचे असंगत मुद्दे पुढे करने हे एक पद्धतीची इमोशनल ब्लॅकमेलिंग ची Sophisticated राजकीय रणनीती असते ज्यात बौद्ध धम्मीय कार्यकर्ते व लोक अलगद अडकतात. तर दुसऱ्या बाजूला VBA चे समर्थक ह

यामध्ये VBA व बाळासाहेब यांचे समर्थक बरयाच अंशी सावध भूमिका घेत आहेत याला कारण हि तसेच आहे कि या आंदोलनामुळे थेट धम्म, आंबेडकरवाद सोडून VBA काहीतरी वेगळेच करत आहे अशी आरोळी (इमोशनल ब्लॅकमेलिंग ची sophisticated राजकीय रणनीती) विरोधक निर्माण करत आहेत.. त्याच रणनीती चा भाग म्हणून विरोधक हे नेहमी प्रमाणे भावनांना प्राधान्य देऊन, बौद्ध जनतेच्या भावना भडकवून, जनतेला भावनिक साध घालून VBA व बाळासाहेब यांना विरोध करून आकस बुद्धीने त्यांची systematically बदनामी करत आहेत.. हे एक प्रकारचे ट्रॉलिंग च आहे ते लिहिणाऱ्याच्या tone वरूनच समजते.. या विरोधकांमध्ये काही प्रामाणिक विरोधक हि आहेत तर काही पैसे घेऊन/स्वार्थासाठी ट्रॉलिंग करणारे हि आहेत.. पण कोण का विरोध करत आहे ते समजण्याची Analytical ability हि निर्माण न झाल्यामुळे खूप सारी गल्लत होत आहे हे हि तितकेच महत्वाचे; हे कसे ओळखावे हा पण एक संपूर्ण स्वतंत्र विषय आहे त्यामुळे या वर आता लिहीत नाही..

मला वाटते वरील VBA समर्थक व विरोधक या दोन्ही लोकांनी Political Science (राजकीय शास्त्र) या discipline च्या मांडणी नुसार या कालच्या राजकीय कृती कडे पाहायला हवे.. Political Scienceच्या दृष्टीने कालच्या कृती कडे आपणास अनेक Political Philosophers/Scientist यांना quote करून पाहता येईल पण मुख्य मुद्दा बाजूला पडू शकतो यामुळे ते टाळून मुद्द्या वरच राहत आहे.. तसे पाहता कालचे आंदोलन हे संपूर्णतः राजकीय स्वरूपाचे होते आणि यात विचारधारा ई. मध्ये आणण्याचे काही कारण नाही.. राजकारण हे एक स्वतंत्र विश्व आहे त्याला धर्माशी/धम्मकारणाशी जोडणे व त्याचा अर्थबोध करून घेणे हीच आज पर्यंतची बौद्ध समूहाने Political Scienceच्या दृष्टीने मोठी चूक केली होती (खोलवर समजून घेण्यासाठी महत्वाचे Political Philosophers read करा)..

धर्म आणि राजकारण हे भिन्न आहेत ते एक नाहीत हे Political Science चे कोणतेही पुस्तक वा थेअरी वाचून पाहिल्यास आपणास स्पष्ट होईल.. त्यामुळे बौद्ध समाजातील राजकारणातील कार्यकर्त्यांनी व त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे बौद्ध धम्मीय लोकांनी हे स्पष्टपने स्वीकारण्याची दृष्टी राजकारण Scientifically समजून घेताना आपनामध्ये विकसीत केली पाहिजे..

बौद्ध धम्मीय जनतेने भावना बाजूला ठेवून “राजकारण हे एक शास्त्र” (Political Science) म्हणूनच पाहायाला हवे व त्याला कोणत्याही पद्धतीने भावनिक दृष्टया पाहू नये.. राजकारणात राजकीय नेते जनतेला फसवण्यासाठी भावनांचा वापर व उद्रेक करतात जेणे करून जनतेचा वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजेच Perspective damage करता येईल व तो damage झाला कि लगेचच भावनांवर आरूढ होऊन स्वस्त राजकीय फायदे लोकांच्या हिताची आहुती देऊन मिळवता येईल.. या पद्धतीच्या रणनीती हे सर्वच राजकीय नेते करत आहे त्यामुळे जनतेने राजकारण Political Science ने निर्माण केलेल्या वैज्ञानिक दृष्टीकोनावरच पाहावे, तपासावे व त्यानुसार राजकीय निर्णय घ्यावे.. असे जर आपण मान्य केले तर सर्वच पक्षांच्या समर्थकांनी एकमेकांविरोधातील ट्रॉलिंग थांबवून वैचारिक स्पष्टतेच्या, जनतेच्या मुद्द्यांच्या आधारावर तसेच Political Science ने निर्माण केलेल्या वैज्ञानिक दृष्टीकोनावर राजकारण व्हावे हा स्वयंशिस्तीचा नियम स्वतःला लावून एक healthy/ सकस पद्धतीचे राजकारण करण्यावर भर द्यायला हवा..

बौद्ध लोकांनी राजकारण व धर्म/धम्म एक आहेत हे अवैज्ञानिक पने मानत राहून आता पर्यंत खूप मोठी चूक केली होती; गल्लत केली होती.. ती गल्लत आता इथून पुढे करू नये हा वैचारिक स्पष्टतेचा संदेश VBA व बाळासाहेब यांनी कालच्या आंदोलनाने दिला आहे.. तसेच VBA हि एकजातीय/धर्मीय पार्टी नसून ती सर्व धर्मियांची पार्टी आहे असे स्पष्ट संकेत या अनुषंगाने करण्यास वाव मिळाला आहे..तसेच बौद्धांनी VBA कडून कोणत्याही धार्मिक अपेक्षा नाही केल्या पाहिजे याचाही स्पष्ट संदेश यातून दिला आहे.. असे करून VBA व बाळासाहेब यांनी सर्व बौद्ध समाजातील लोकांची आतापर्यंतची राजकीय कोंडी फोडली आहे आणि हीच माझ्या दृष्टीकोनातून अत्यंत क्रांतिकारी बाब आहे.. यातून बाळासाहेबांनी बौद्धांच्या राजकारणात एक Paradigm Shift /आमूलाग्र बदल केला आहे या बद्दल बाळासाहेब व VBA चे करावे तितके कौतुक कमी आहे..

त्यामुळे मला बाळासाहेबांनी व VBA यांनी कालच्या आंदोलनातून एक आमूलाग्र बदल दिसतो आहे…तरी या बदलाचे व दृष्टीकोनाचे सर्व राजकीय कार्यकर्त्यांनी (Irrespective of Parties); मुख्यत्वे बौद्ध समूहातील लोकांनी स्वागत करायला हवे..

सागर झेंडे (PhD Scholar,TISS- MSc International Development & Management- Sweden, MSW-TISS, UGC-NET, JRF, SRF, BSW )

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: