Logo

न्याय नाही बाईला, सन्मान येथे गाईला

- 06/11/2020   Friday   9:29 am
न्याय नाही बाईला, सन्मान येथे गाईला

भारताचा विचार केला तर गाईला आई म्हणून तिचे संरक्षण करायचे, परंतु बाई असेल तर फक्त तिला भोगायचे हेच चित्र सध्या दिसत आहे. जातीची द्वेषभावनेची एवढी घाण डोक्यात भरलेली आहे की माणसाला सत्य गोष्टी सुद्धा फक्त जातीमुळे सत्य वाटत नाहीत. गोमांस घरात आणल्याच्या संशयावरून माणसाची हत्या केली जाते, कारण गाईला आईचा दर्जा दिला

जातो. जेथे गाईला माता म्हणतात, तेथेच बाईला सामुहिक भोगतात, आणि बाई जर जातीव्यवस्थेच्या उतरंडीमध्ये खालच्या जातीतील असेल तर आरोपीच्या बाजुने उभे राहुन प्रकरण दाबण्यात येते. गाईसाठी नवीन कायदे करून गाईचे पोषण केले जाते, महिलांसाठीचे असलेले कायदे तोडून शोषण केले जाते हिच संस्कृती आपल्या अपेक्षित असेल तर बाईने नेमके जगायच तरी कसे. गाईला स्पर्श करण्याची लोकांना आज भिती वाटत आहे. कारण जर गाईला स्पर्श केला आणि गाईला काही झाले तर मानसाच्या वस्त्या जळण्याची भिती आहे परंतु खालच्या जातील बाईची ईज्जत आईच्या स्पर्शापेक्षा सस्ती आहे म्हणून म्हणून नेमक्याच वयात आलेल्या, काहीतरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगून मेहणत करणाऱ्या मुलींवर बलात्कार होतात, नराधम बलात्कार करून थांबत नाहीत तर अमानुष पणे वागून तिची हत्या करतात. वरच्या जातीतील आरोपी असल्याने आरोपाची तिव्रता कमी केली जाते, पुरावे नष्ट करण्यासाठी सर्वजन मदत करून आरोपींना वाचवले जाते. म्हणून तर दिवसेंदिवस बलात्काराचे प्रमाण वाढत आहे. जात, धर्म प्रतिक यांचा वापर फक्त येथे माणसा माणसात तेढ निर्माण करून देण्यासाठी केला जातो. गाईला आदर्श मानुन फक्त मुस्लिम द्वेष कयायचा एवढेच आहे. बाकी गाईचा दुसरा कुठेच वापर वा गाई बद्दल आस्ता नाही. परंतु मुस्लिमांना टार्गेट करण्यासाठी गाय ही एक ढाल म्हणून काम करते. म्हणून तर गाईचा सन्मान वाढला आहे. गाईबद्दल आस्था आणि श्रद्धा असती तर भारतातील सर्वात मोठ्या पहिल्या तिन कंपन्या हिंदुच्या नसत्या. गाईचे मटण विदेशात पाठवून हजारो करोड रुपये कमविणारे गाय व गोवंश हत्या करतात तेव्हा त्यांच्या विरोधात कोणी बोलत नाही. उलट गोवंश हत्या बंदी कायदा लागु करणाऱ्या सरकारच्या काळात सर्वात जास्त बिफ भारतातून निर्यात झाले. आणि होत आहे. म्हणजे गाईचा सन्मान फक्त सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठीच. एकीकडे गाईला माता म्हणून पुजा करायची आणि दुसरीकडे जी खरच या जगाची जननी आहे तीला भोगायचे आणि जाळून टाकायचे. हे कोणाच्या मेंदूला पटणारे आहे. खालच्या जातीतील मुली महिला यांच्या वर बलात्कार करायचे आणि आणि दलित मुलीवर बलात्कार म्हणून जाहीर केले कि ना मिडीया दखल घेत नाही इतर सामाजिक संघटना दखल घेत. उलटपक्षी दलित मुलीवर बलात्कार अशी बातमी आली कि अस समजायचं आरोपींना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. बलात्कार झालेल्या मुलीची कोणतीही ओळख सांगु नये असे नियमात असताना जातीव्यवस्थेतील खालच्या जातीतील मुलगी असेल तर तिचे नाव, फोटो, घरचा फोटो, आई वडीलांचा फोटो अशी सर्व ओळख जाहीर केली जाते. आणि आरोपीचे नावे गुपीत ठेवले जातात. दलित मुलीवर बलात्कार अशा आशयाच्या बातम्या खूप वाचल्या, ऐकल्या पण वरच्या जातीतील आरोपीची जात दाखवून अमुक जातीतील नयाधमांधी मुलीवर बलात्कार केला हे कधिच दाखवणार नाहीत. यामध्येच तर खरा जातीवाद आहे. आणि आरोपी खालच्या जातीतील असतील आणि पिडीता वरच्या जातीमधील असेल तर दलित युवकांनी मुलिवर बलात्कार केला अशा बातम्या पसरवून. गुन्हेगारांना, आरोपींना, गुन्हा बघून नाही तर जात बघून शिक्षा केली जाते याची प्रचिती येते.
          धर्म जरी एक असला तरी न्याय देतांना किंवा निर्णय घेताना सत्य परिस्थिती नाही तर जातीचा विचार होतो, कोणत्याही बलात्काराचे समर्थन मुळीच करत नाही परंतू दिल्लीला बलात्कार होतो तर त्या पिडीतेचे नाव आजही लोकांना निर्भया वा दामिनी म्हणून परिचित आहे. आणि हाथरस मध्ये बलात्कार होतो तेव्हा त्या मुलींचे नाल गाव पुर्ण जाहीर केल्या जाते. बलात्कार हा बलात्कारच असतो पण दोन्ही ठिकाणच्या बातम्या वेगवेगळ्या, तपासणी वेगवेगळी, आणि न्याय सुद्धां वेगवेगळा का? दिल्ली मध्ये जेव्हा बलात्कार होतो तेव्हा आरोपीच्या नावाने ओरडायचे आणि हाथसर ला प्रकरण झाले तर मुग गिळून गप्प बसायचे हे मुळात संस्कार आहेत तरी कोणाचे. हाथरस चे प्रकरण फक्त बलात्कार नसुन पिडीतेसह लोकशाहीची केलेली मुस्कटदाबी आहे. आरोपी वरच्या जातीतील असले कि सर्व यंत्रणा कामाला लागुन पुरावे नष्ट करण्याचे काम करते आणि हे कटकारस्थान आजचे नाही पुर्वी पासून आहे.  हाथरस प्रकरणातील आरोपिंना वाचविण्यासाठी तेथील मोठ्या पदावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले तिच्या वर बलात्कार झालाच नाही. तिचा हड्डि तुटल्याने झालाय. आणि हे कधी सांगितले जेव्हा ती या जगात नव्हती. पि एम नुसार तिचा मृत्यू हड्डि तुडल्याने झाला हे मान्य केले तरी मृत्यू हड्डि तुडल्याने झाला म्हणजे बलात्कार झाला च नाही हे म्हणणे म्हणजे मानुसकीला काळीमा फासुन आपली अक्कल किती आहे याची पावती देणे होय. त्या पोलीस अधिकारी आणि या व्यवस्थेला प्रश्न आहे. हाथरस मधील पिडीतेला हॉस्पिटलमध्ये १४ सप्टेंबर रोजी भरती करण्यात आले होते तेंव्हा तिची वैद्यकीय चाचणी केली नाही का? बलात्कार पिडीता मुलीला वैद्यकीय चाचणी शिवाय गुन्हा नोंदवून उपचार सुरू झाला च कसा ? ती हॉस्पिटलमध्ये जिवंत असताना कोणीच बोलले नाहीत बलात्कार झाला नाही म्हणून, ती गेली, रात्रीच तिला जाळून टाकले आणि सकाळी म्हणतात कि तिच्या वर बलात्कार झालाच नाही. एका पोलीस आधिकाऱ्याने किमान वर्दीचे तरी भान ठेवून वक्तव्य करायला पाहिजे. वर्दीच्या आत सुद्धां एक माणुस आहे माणसाच्या मनाने प्रमाणिक विचार जरी केला तरी सत्य समोर येते पण जातीसोबत माती खावी लागते आणि व्यवस्थेची लाचारी करावी लागते म्हणून खालच्या जातीतील मुलींना न्यायच मिळु नये असे नियोजन केले जाते. न्याय मिळू नये याचे दुसरे उदाहरण म्हणजे बलात्कार पिडीत मुलीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. त्यामध्ये एक व्यक्ती त्या मुलीचा इंटरव्ह्यू घेताना दाखवला आहे त्यामध्ये ती मुलगी म्हणते या अगोदर देखील माझ्या वर बलात्कार करण्याचा प्रयत्न झालेला आहे. हा व्हिडीओ व्हायरल करण्या मागचा उद्देश काय? आज पर्यंत किती पिडीतेचे अशा प्रकारचे व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत.? पिडीतेचा व्हिडीओ घ्यायचा तर चेहऱ्या उघडा ठेऊन व्हिडीओ घेतात का? याचे उत्तर नाहीच आहे. परंतु मुलीची जिभ छापलीच नाही याचा पुरावा ती गेल्यानंतर तो बनावट व्हिडीओ देणार व आरोपीवरील अजून गुन्हे कमी होणार हे त्या मागचे षडयंत्र आहे. जी पंधरा दिवसापासून मृत्यशी झुंझ देत होती, जिची जीभ छाटली गेली तीचा इंटरव्ह्यू सार्वजनिक करणे म्हणजे आरोपिंना वाचविण्यासाठी सर्वांना सज्ज करणे होय. मुलाखत घेतांना फक्त मुलीचा चेहरा दाखवण्यात येत होता आजुबाजुचा परिसर बोलताना दाखवला गेला नाही. बोलणे झाल्यावर आजूबाजूला कँमेरा फिरवला गेला तेव्हा ती पिडीता निपचित फडलेली होती हात सुद्धा हालवत नव्हती, दुसरी गोष्ट इंटरव्यु घेताना तेथे पोलीस, पिडीतेचे नातेवाईक, डॉक्टर यापैकी कोणीही उपलब्ध असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत नाही याचा अर्थ तो व्हिडिओ बनावट केलेला आहे त्या पिडीतेचा नाही.
       एका मुलीवर बलात्कार होतो तीची जिभ छाटली जाते बरगड्या मोडून टाकला जातात, मृत्यु शी झूंज देत १५  दिवस ती संघर्ष करते. आणि ती मेल्यानंतर तिची बॉडी घरच्यांना न सांगाता जाळली जाते, ती मेल्यावर बलात्कार झालाच नाही म्हणून पिएमचा संदर्भ दिला जातो. जिभ छाटली गेली नाही हे दाखवण्यासाठी व्हिडीओ व्हायरल केला जातो. बॉडी तिचीच जाळली जाते की नाही याची माहिती पोलिस देत नाहीत. सरकारला सहकार्य करा असा समज कलेक्टर पिडीतेच्या नातेवाईकांना देतात. यातून काय अर्थ निघतो आणि हे सगळं कृत्य खरच माणसाला शोभण्या सारखं आहे. हाथरस प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालून त्यांच्या वरील गुन्हे कमी व्हावे म्हणून पुरावे नष्ट करणे खोट बोलणे माणसाच्या नितीमतेला पटते? जी जात, जो धर्म माणसाची आणि सत्याची बाजु घेऊ देत नाही. गुन्हेगारांना मदत करावी लागते ती जात श्रेष्ठ की भ्रष्ट. सगळा खेळ जातीव्यवस्थेचा सुरु आहे. हिच घटना गाईसोबत झाली असती तर देश पेटला असता, मिडीया रात्रंदिवस गाईच्या आजुबाजुला असता पण घटना बाईसोबत घडली म्हणून तिला न्याय मिळाला एवढी नैतीकता सुद्धां शिल्लक राहली नाही. पिडीतेच्या घरी कोणी भेटायला जाऊ नाही सत्य माहिती समोर येऊ नाही म्हणून १४४ कलम लागु करून मुलीला न्यायापासुन दुर ठेवण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे. गाईला पुजल्या जाणाऱ्या देशात बाईला भाजले जाते याचे दु:ख वाटते.

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: