Logo

बोटांनी ठेवले पोटांना उपाशी; राज्यातील स्वस्त धान्य यंत्रणेचा जय हो…!

- 30/03/2021   Tuesday   6:00 am
बोटांनी ठेवले पोटांना उपाशी; राज्यातील स्वस्त धान्य यंत्रणेचा जय हो…!

“काय झाले अजूनही चुलीला ठावठिकाणा नाही” ” काय कराव माय रेशन दे ना बवा मागच्या बारीबी तेच झालं अन आताय तेच.”

“घरात रेशनाचा दाना नाही”

रोज रोज म्हणाव कुणाला मगाव?

” कसं काय एवढ्या लवकर संपल ग माय”

“आग संपलं नाही भेटलंच नाही’

“काऊन”

अग बाई दर महिन्याला जाऊन चकरा मारू मारू येते ,,

“तरी काय तो अंगुठा उमटत न्हाई”

म्हणून रेशन नाही

हे आहेत राज्यातील दोन निराधार वृद्ध महिलांचे संवाद .रोजच्या अर्थ पिडांनी चौफेर घेरले आहे.त्यातून सुटण्याचे संकेत निशब्दच अशाच अवस्थेत एकीकडे देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहात आहे. तर दुसरीकडे बोटाच्या रेषावरून त्याच्या पोटाच्या भूकेचा तर्क लावून अकलेचे तारे तोडणारे शासन .कोरड्या भाषणाने देश जर समृद्ध झाला असता तर आज जगातील सर्वात प्रभावशाली महासत्ताक देश म्हणून जगाच्या नकाशावर भारताने आपले नाव नक्कीच कोरले असते. पण शेवटी अंधार इथला संपत नाही. असा हा प्रकार नाही ,तर उजेडाचे प्रयत्न न करता अंधाराला चालना देणाऱ्या या व्यवस्थेत पुन्हा पुन्हा त्याच रेघा ओढल्या जातात की ,अंधार इथला संपत नाही ;पण यातील वास्तव म्हणजे अंधार संपून दिला जात नाही .राज्यात स्वस्त धान्य दुकानातून दारिद्र रेषेखालील ,अंत्योदय ,निराधार ,वृद्ध ,विधवा ,शेतकरी, शेतमजूर ,यासारख्या घटकांना पिवळे ,केशरी ,पांढरे अशा प्रकारची शिधापत्रिका आहेत. त्याद्वारे तमाम जनतेला स्वस्त धान्य मिळते. पण याच यंत्रणेत एक महत्त्वाची बाब आहे .ती म्हणजे हाताच्या बोटाचे ठसे घेऊन स्वास्थ धान्य दिले जाते.पण ज्यांचे बोटे तेथील मशीनमध्ये जुळत नसल्याने माणसाला उपाशीपोटी ठेवणाऱ्या या यंत्रणेचा यश कशात तोलायचं ?महाराष्ट्रात असंख्य दलित ,पीडित ,गोर गरीब शेतमजूर ,स्थलांतरित कामगार ,या सगळ्यांचा एक मोठा वर्ग आहे .कामानिमित्त यांना रोजगारासाठी बाहेर गावी महिने महिनोन -महिने,वर्ष -वर्ष अशा प्रकारचे स्थलांतर करावे लागते .गावात घरी वृद्ध आई-वडील सोडून गेल्यानंतर कुटुंबातील वृद्धांची गावाकडे कमालीची दुर्दशा होते .परिणामी कधी कधी तर उपाशी पोटी दिवस काढावे लागता.कारण काय तर रेशन दुकानाकडील मशीनमध्ये त्यांचा अंगठा जुळत नाही.म्हणून रेशन दुकानदार त्यांना धान्याविना रिकामं पाठवतो.”आम्हाला रेशन का मिळत नाही”? असा सवाल केला असता “तुमचा अंगठा येत नाही”.”मग आम्ही खयायच काय ?आमच्या हिस्याच रेशन आले नाही का ? “आले पण अंगठा येत नाही “हेच चित्र लोकांना उपाशीपोटी ठेवत आहे.अशाप्रकारची स्वस्थ धान्य यंत्रणा माणसाला अंगठा जुळत नाही ;म्हणून उपाशीपोटी ठेवत असेल तर करायचं काय ?असा सवाल निर्माण होतो.संपूर्ण जीवन कंठत शेतात ,घरी ,बांधकाम, यासारख्या अन्य ठिकाणी रोजंदारी करून सगळी हयात गेलेल्या परिणामी जीवनाच्या शेवटच्या काठेवर आपल्याच बोटांनी आपल्याच पोटाची भूक अडवली हेच स्पष्ट दिसते.राज्यातील ग्रामीण भागात असा हा प्रकार मोठ्याप्रमाणात आढळतो.उतारवयात बोटावरील रेषा मिटतात .कामांनी त्या गुळगुळीत होतात. म्हणून आपलीच बोटे आपल्याच पोटासाठी खोटी ठरत आहेत. त्यामुळे स्वस्थ अन्न धान्य पुरवठा यंत्रणेने यातील बाबी लक्षात घेऊन वृद्ध निराधारांच्या बाबतीत सुधारणा करणे गरजेचे आहे.आज एकीकडे कोरोनामुळे लॉक डाऊन लागला. त्यात अंगठ्याच्या आधारावर रेशन;आणि देशातील वातावरण लक्षात घेतले असता वर्तमानातील समस्यांचे निराकरण नकरता भविष्यकालीन वाटचालीपेक्षा बोलघेवड्या इतिहासयुगात मार्गक्रमण होत आहे. त्यामुळे सगळीकडे बोलणे आणि मासिक टार्गेट कमावण्याच्या प्रयत्नात सामान्य माणसांची होणारी अवहेलना ही मनाला बोचणारी असली तरी तुमच्या अशा यंत्रणेचा जय हो…!

( –मनोहर सोनकांबळे

8806025150

Email—[email protected]

एमफिल संशोधक विद्यार्थी

स्कुल ऑफ मीडिया स्टडीज स्वा.रा.ती.म विद्यापीठ, नांदेड)

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: