Logo

बीआरएस सोनेपठ तालुक्यातील गावागावात नेणार - सुधिर बिंदू

- 28/05/2023   Sunday   3:33 pm
बीआरएस सोनेपठ तालुक्यातील गावागावात नेणार - सुधिर बिंदू

सोनपेठ दि.२९(प्रतिनिधी) भारत राष्ट्र समितीच्या वतीने सोनपेठ तालुक्यातील गावागावत प्रचार दौरा दि.१ जुन पासुन दत्त वाडी नैकोटा येथुन सुरु करण्यात येणार असल्याचे समितीचे सुधीर बिंदू यांनी सांगितले.तालुक्यात घुमणार गुलाबी वादळ अबकी बार किसान सरकारचा नारा देत भारत राष्ट्र समिती सोनेपठ तालुक्यातील गावागात जाणार आहे.

तेलंगाणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री के.चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातुन अब की बार किसान सरकारचा नारा देऊन राज्यात व देशात किसान सरकार स्थापन करण्याची घोषणा दिली . 
तेलंगानात श्री केसीआर सरकार राबवत असलेल्या शेतकऱ्यांना शेतीत गुंतवणुकीसाठी एकरी दहा हजार, शेतीसाठी चोवीस तास योग्य दाबाची मोफत वीज,शेतीला पाणी , गावपातळीवर शासकीय खरेदी या शेतकऱ्यासाठीच्या योजना बरोबरीनेच शादी मुबारक,कल्याण लक्ष्मी, शिक्षण आरोग्य व सामाजिक सुरक्षेच्या चारशे हुन अधिक योजना महाराष्ट्रात राबविण्यासाठी राज्यात पक्ष विस्ताराचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 
केसीआर यांनी राज्यात अनेक सभांचा धडाका लावुन  मोठ्या प्रमाणावर राज्यातील लोकांना आकर्षित केले आहे. सोनपेठ तालुक्यातील ५१ गावांमध्ये भारत राष्ट्र समितीच्या शाखा स्थापन करण्यात येणार असुन . केसीआर यांच्या योजना गावोगाव पोहचवुन सामान्य नागरिकांना या राजकीय आंदोलनात सहभागी करुन घेण्यासाठी दि १ जुन रोजी तालुक्यातील सुप्रसिद्ध दत्तवाडी नैकोटा येथुन प्रचार अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. या साठी भारत राष्ट्र किसान समितीचे अध्यक्ष माणिकराव कदम,महेश फड,जिल्हा समन्वयक पवन करवर,पाथरी विधानसभा समन्वयक बालासाहेब आळणे,भगवान शिंदे, रंगनाथ चोपडे यांच्या सह राम लटके,गणेश पाटील,भगवान जोगदंड,कांबळे गुरुजी,भागवत बचाटे, विश्वंभर गोरवे,प्रताप भंडारे, बाळासाहेब चांदवडे,आण्णा जोगदंड,माऊली जोगदंड सोमनाथ नागुरे हे उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्र संत पाचलेगावकर महाराजांच्या कर्मभूमीतुन राष्ट्र उभारणीचे आंदोलन सुरु करणार सुधीर बिंदू 
भारत राष्ट्र समिती हे राष्ट्राच्या पुर्नउभारणीचे राजकीय आंदोलन आहे . नागरीकांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी राजकीय आंदोलन गरजेचे असुन सर्व सामान्य माणसाला राजकीय आंदोलनासाठी तयार करण्याच्या या मोहामेची सुरुवात श्री क्षेत्र दत्तवाडी येथुन करण्यात येणार असुन
राष्ट्र संत पाचलेगावकर महाराज यांनी याच भूमीतुन राष्ट्र उभारणीचे कार्य सुरु केले होते . या कार्यक्रमाला तालुक्यातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारत राष्ट्र समितीचे सुधीर बिंदु यांनी केले आहे.

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: