Logo

श्रावण देवरे यांनी ओबीसी समाजाची दिशाभूल करू नये - रविंद्र रोकडे

- 10/06/2023   Saturday   12:08 pm
श्रावण देवरे यांनी ओबीसी समाजाची दिशाभूल करू नये - रविंद्र रोकडे

संख्येने 52% टक्के असलेला ओबीसी समाज आजही निद्रित अवस्थेत आपणास आढळतो, त्याला जबाबदार ओबीसीतील लबाड नेते आहेत, जे ओबीसी समाजाची दिशाभूल करतात. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी, वा चर्चेत राहण्यासाठी एखाद्या विकसनशील संघटनेवर किंवा पक्षावर रेघोट्या मारण्यात त्यांना रस वाटतो.

असेच काही कृत्य ओबीसी चे स्वयंघोषित नेते श्रावण देवरे यांनी केले . भारत राष्ट्र समिती पक्षाचा विकासाची भुरळ महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला पडली असून शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समिती पक्षात सामिल होऊ लागले आहे. 
मूळ शेतकरी आणि ओबीसी समाज हे एक समीकरण झाले आहे. याला खिंडार पाडण्यासाठी भाजपने श्रावण देवरे यांना छुपा पाठिंबा देत टीकास्त्र सोडण्यासाठी रणनीती आखली आहे हे  सिद्ध झाले आहे.
ओबीसी समाज हा पूर्णतः शेती करणारा, वा शेतीवर अवलंबून राहणार समाज आहे. देशात सरकारने कृषी विरोधी धोरण राबवले असून, भारत राष्ट्र समितीद्वारे त्याचा विरोध व प्रतिकार करीत आहे. तेलंगाणा राज्यात जी कृषीक्रांती झाली तेथे राबविण्यात आलेल्या कल्याणकारी योजना ह्या साऱ्या सर्वसमावेशक होत्या.
ज्यात दलित, ओबीसी, शोषित, वंचित, कामगार, शेतकरी, मराठा समाज व ब्राम्हण समाज या सर्व घटकांचा समावेश आहे. तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री  के. चंद्रशेखर राव यांनी दूरदृष्टी ठेवत सर्वसमावेशक भूमिका साकारली.
देशात सर्वात मोठे बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधले, दलित कुटुंबाला उत्थानसाठी दहा लाख रुपये मदत. शेतकरी ओबीसी बांधवांना प्रती एकर दहा हजार रुपये प्रति वर्षी विनापरतवा मदत, शेतीसाठी विमा मोफत, शेतीसाठी मोफत वीज,पाणी  दीव्यांग घटकास तीन हजार रुपये पेन्शन, निराधार व ज्येष्ठ नागरिकांना दोन हजार रुपये पेन्शन, डोळ्यांचे शत्रक्रिया व उपचार मोफत, दोन बेडरूम असलेली घरे शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध आहे. अश्या बऱ्याच कल्याणकारी योजना लागू केल्या.  
कल्याणकारी योजना सुरू करताना त्यानी सर्वसमावेकता असावी त्यासाठी प्रयत्न केला. दलित, ओबीसी , किंवा जात पात, धर्म  या साऱ्या बाबी न पाहता केवळ कल्याणकारी योजना निर्माण व्हावा यावर भर दिला. 
तेलंगाणा सरकारने ब्राम्हण समाजासाठी सदन बांधताच भाजपच्या इशाऱ्यावर श्रावण देवरे हे भारत राष्ट्र समिती पक्षावर व तेलंगणा सरकारवर  टीकास्त्र सोडायला सुरुवात केली.  
 ब्राम्हणांना सदन आणि ओबीसी दलितांच्या वाट्याला काही नाही असे चुकीचे विधान करत ओबीसी आणि दलित समाजाच्या मनात चुकीचा समज निर्माण करण्याचे काम श्रावण देवरे करीत आहेत, 
ओबीसी मुख्यमंत्री बहुजन सरकार तसेच ओबीसी जनगणना सत्याग्रह इत्यादी कार्यक्रमाद्वारे राज्यात ओबीसी व दलित चळवळी राबविण्यासाठी भारत राष्ट्र समिती कटिबद्ध आहे. 
परंतु अशा चुकीचे धोरण अवलंब करणाऱ्या नेत्यांमुळे ओबीसी समाज मात्र भरकटला जातो, हे आपल्या देशाचे दुर्भाग्य आहे.


- रविंद्र रोकडे, मुंबई कोकण विभागीय माध्यम प्रसारक
(भारत राष्ट्र समिती)

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: