Logo

पोहाळे लेणीवर वर्षावास आरंभ सोहळा संपन्न!

- 08/07/2023   Saturday   5:19 pm
पोहाळे लेणीवर वर्षावास आरंभ सोहळा संपन्न!

आषाढ महिन्यात येणाऱ्या कल्याणमैत्री पौर्णिमेला जगभरात अनन्यसाधारण महत्त्व आहे, या दिवसाला पहिले धम्मचक्र प्रवर्तन असेही म्हटले जाते, विश्वातील सर्व जीवांसह मानवाच्या कल्याणासाठीचा मार्ग तथागत बुद्धांनी या दिवशी सांगितला म्हणून या पौर्णिमेला गुरूपौर्णिमा असेही संबोधले जाते. पोहाळे बौद्ध लेणी ता. पन्हाळा जि. कोल्हापूर येथे बौद्ध परंपरेतील वर्षावास आरंभ दिवस मोठया उत्साहात साजरा

 करण्यात आला. युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य तसेच मूर्ती आणि शिल्प संशोधन संस्था औरंगाबाद शाखा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमीत्ताने लेणीवर सामूहिक बुद्ध वंदना, दिपोत्सव आणि अभ्यासकांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. युवा बौद्ध धम्म परिषद चे राज्य सचिव आयु. सतिश भारतवासी यांनी वर्षावासाचे बौद्ध जगतातील महत्व समजून सांगितले. आयु. बापूसाहेब राजहंस जिल्हाध्यक्ष कोल्हापूर युवा बौद्ध धम्म परिषद यांनी कोल्हापूर जिल्हा आणि महाराष्ट्रात केलेल्या बौद्ध लेणी अभ्यास दौऱ्यांची इतंभूत माहिती उपस्थितांना दिली. पाली रिसर्च सेंट, मुंबईचे आयु. जगन्नाथ काळे यांनी पाली भाषा, धम्मलिपी, धम्म अज्जयन चारिका आणि लेणी कशी अभ्यासावयाची याबद्दल माहिती देऊन पोहाळे लेणीविषयी माहितीचे प्रात्यक्षिक दिले. डॉ. संतोष भोसले राज्याध्यक्ष, युवा बौद्ध धम्म परिषद यांनी जागतिक वारसा म्हणजे काय याविषयी सांगून पोहाळे लेणी मधील स्तूपाविषयी माहिती दिली. युवा धम्म कार्यकर्ते आयु. अभिषेक कांबळे यांनी कर्जत येथील बुद्धिस्ट सेमिनरीला भेट दिल्याचा अनुभव सांगितला आणि घरपण येथील बुद्ध विहार सक्रीय असल्याची माहिती दिली. लॉर्ड बुद्धा टीव्ही चे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी आयु. दयानंद जिरगे यांनी सर्वांना कल्याणमैत्री पौर्णिमा आणि वर्षावास आरंभाच्या सदिच्छा दिल्या. आयु. रविंद्र हलसवडेकर साहेबांनी सर्वांना पाली भाषा अभ्यास ची पुस्तिका सर्वांना भेट दिली. सामुहिक भोजन करण्यात आले. कोल्हापूर शहरापासून १५ की. मी. अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेली ही लेणी दिवसेंदिवस लक्षवेधी बनत आहे त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला पावसाची आणि अडचणींची तमा न बाळगता तमाम बौद्ध बांधवांनी पोहाळे लेणीवर यावे असे आवाहन युवा बौद्ध धम्म परिषद कडून करण्यात आले. या कार्यक्रमास मनोहर मुचंडी सांगली, योगेश बाळू काळे यलुर, उमेश कांबळे घरपण, बाळासो कांबळे गोटखिंडी, विजयश्री कांबळे गोटखिंडी, योगेश विठ्ठल काळे यलुर, तुषार काळे यलुर, धनाजी कांबळे रांगोळी, वर्षा कांबळे रांगोळी, विजय पाटील उजळाईवाडी, उषा जिरगे सांगवडे, दिपक कांबळे गडहिंग्लज आदी उपस्थित होते.

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: