Logo

लाव्हीन आणि तिची पिल्लं - डाॕ.बाबासाहेब आंडकरांनी सांगीतलेली बोधकथा

- 28/04/2023   Friday   10:02 am
लाव्हीन आणि तिची पिल्लं - डाॕ.बाबासाहेब आंडकरांनी सांगीतलेली बोधकथा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर याचं मुंबई येथील दि.२२/११/१९५१ रोजी झालेले भाषण दि. २४/११/१९५१ रोजी जनता पत्रकातून प्रसिद्ध झालं,त्यात बाबासाहेबांनी “लाव्हीन आणि तिची पिल्लं” हि बोधप्रद कथा सांगितली.

भादाव्याचा महिना होता.सर्वत्र शेतं बहरून आली होती.त्यापैकी एका पोसलेल्या शेतात लाव्हीन पक्षिणीच घरटं होतं.तीची पिल्ले अगदीच लहान होती.त्यांच्या चार-पाण्यासाठी तिला खूप दूर दूर जावं लागत असे.शिवाय तिच्या पिल्लांना सांभाळणारे कोणीही नव्हते.त्यामुळे तिने सुरक्षेच्या दृष्टीने काही उपदेश दिले.तिने आपल्या पिल्लांना सांगितले,“पिल्लांनो सावध रहा, आपल्या आसपास कोण येते ते पहा, कोण काय बोलते ते ऐका आणि मी परत आल्यावर मला सांगा,” तीची पिल्लेही आईचा उपदेश काटेकोरपणे पाळत आणि आईला दिवसभरातील संपूर्ण माहिती सांगत.
एके दिवशी लाव्ही परतली,तिची पिल्ले तिच्या भोवती जमा झाली,तिच्या चोचीशी झटू लागली.तिने आणलेला चारापाणी ती खाऊ लागली.व खाता खाता आईला म्हणाली,“आई,आज शेतकरी आला होता,तो त्याच्या मुलांना सांगत होता कि,“आपलं पीक आता कापणीला आलं आहे, आता ते कापायला हवं,तुम्ही उद्या आपल्या शेजा-यांना आपल्या मदतीला यायला सांगा.आपण उद्या आपल्या शेताची कापणी करणार  आहोत.”असं सांगून पिल्लांनी आपल्या आईला विचारले, “आई उद्या आपलं घरटं तुटणार का?”
लाव्हीने तिच्या पिल्लांना धीर देत सांगितले,“बाळांनो भिऊ नका त्या शेतक-याच्या मदतीला कोणीही येत नाही आणि तो काही उद्या शेत कापणार नाही.” तिचे बोलणे खरे ठरले.शेतक-याच्या मदतीला एकही शेजारी आला नाही आणि त्याने काही शेत कापले नाही.मग शेतकरी त्याच्या मुलांना म्हणाला,“अरे,आपण तोंडघशी पडलो आहे,आपले सगळे शेजारी नालायक आहेत.ते आपल्या मदतीला आले नाहीत.आता तुम्ही आपल्या सर्व नातेवाईकांना बोलावून आणा. त्यांच्या मदतीने आपण उद्या शेताची कापणी करू.”पिल्लांनी हि सर्व हकीकत सायंकाळी आईला सांगितली.व पुन्हा प्रश्न केला कि उद्या आपलं घरटं तुटेल का? पण लाव्हीने त्यांना पुन्हा धीर देत सांगितले कि शेतक-याच्या मदतीला त्याने नातलग देखील येणार नाहीत आणि उद्याही आपलं घरटं तुटणार नाही.लाव्हीचा अनुभवी अंदाज तंतोतंत खरा ठरला आणि पुन्हा तसेच घडले,त्याचे नातेवाईक देखील त्याच्या मदतीला आले नाहीत.आता शेतकरी पुरता संतापला आणि त्याने मुलांना सांगितले,आपले शेजारी आणि नातेवाईक हे सर्व नालायक आहेत.आपण त्यांच्या वर विसंबून न राहता उद्या स्वत:च कापणी करू,कारण पिकं दाण्यांच्या ओझ्यानं पुरती वाकली असून मातीमोल होऊ लागली आहेत.तेंव्हा तुम्ही ताबडतोब जाऊन विळे-कोयते यांना धार लाऊन आणा.” हि परिस्थिती पिल्लांनी सांगितल्यावर मात्र लाव्हीने लगेच पिल्लांना सांगितले, “पिल्लानो चला आपल्याला ताबडतोब हे शेत सोडावे लागेल.कारण उद्या सकाळी-सकाळी शेतकरी हे शेत कापणार आहे.त्यामुळे आपले घरटेही मोडले जाईल.” मग पिल्लांनी आईला विचारले, “आई तू हे कशावरून म्हणतेस?” लाव्ही म्हणाली, “पिल्लांनो जे दुस-यांवर विसंबतात त्यांची कामे अडून बसतात.जे स्वत: कंबर कसतात त्यांची कामे पूर्ण होतात.” असे म्हणून तिने पिल्लांना घेतले आणि दूर दुस-या झाडावर उडून गेली.
तात्पर्य :- या गोष्टीच्या आधारे बाबासाहेबांना हे सुचवायचे आहे कि,“ज्याचा उद्धार त्यानेच करावयाचा आहे,त्यासाठी दुस-यावर विसंबून राहू नका.”
वरील कथे प्रमाणे आपण सर्व एकजुटीणे उभे राहिलो तर या समाजाचाच नाही तर या देशाचा सुद्धा उद्धार झाल्यावाचून राहणार नाही.

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: