Logo

२५ नोव्हेंबर २०२३ ला 'भारतीय संविधान गुण गौरव परीक्षा'

- 12/09/2023   Tuesday   9:27 am
२५ नोव्हेंबर २०२३ ला  'भारतीय संविधान गुण गौरव परीक्षा'

'भारतीय संविधान गुण गौरव परीक्षा-२०२३' आप आपल्या कार्यक्षेत्रात राबविण्यासंदर्भात सहकार्य मिळणे बाबत आयोजकाकडून आवाहन करण्यात आले आहे.

रक्षित  सामाजिक संस्था-म्हसळे स्थापित 'संविधान गुण गौरव समिती' तर्फे जनमानसात संविधानिक आदर्श व मूल्ये रुजावीत, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन सातत्याने करत असतात त्यात. सभा, संमेलनांसह दररोज सोशल मीडियाच्या माध्यमातून रोजच्या रोज संविधानाच्या प्रत्येक अनुच्छेदाची सर्वांगाने माहिती साध्या-सोप्या भाषेत प्रसारित करण्याचा संस्थेचा उपक्रम नित्यनियमाने चालू आहे. याच उपक्रमांचा पुढील भाग म्हणून संविधान स्विकृती दिनाचे औचित्य साधून या वर्षी संविधान स्वीकृती दिनाच्या पुर्वसंध्येला म्हणजेच २५ नोव्हेंबर २०२३ वार-शनिवार रोजी महाराष्ट्र राज्य स्तरावर 'संविधान गुण गौरव परीक्षा-२०२३' घेण्यासंदर्भात आम्ही प्रयत्नशील आहोत. 
     आमच्या संविधान जनजागृतीच्या विविध उपक्रमांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघून, ह्या परिक्षेच्या उपक्रमाला देखील अधिक व्यापक स्वरूप देऊन जनमानसांपर्यंत संविधान जनजागृतीची चळवळ पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. परंतु आमच्याकडे उपलब्ध असलेलले मनुष्यबळ व साधनसंपत्ती यांचा विचार करता आम्हास प्रचंड मर्यादा येत आहेत. तरी आम्हास ही 'संविधान गुणगौरव परीक्षा' राबविण्यासंदर्भात आपल्या कार्यक्षेत्रात आपले मोलाचे सहकार्य मिळाले, तर निश्चितच संविधानिक आदर्श व मूल्ये जनमानसांपर्यंत पोहोचविणे आपल्या सहकार्याने अधिक सोयीस्कर होईल. तरी याबाबत आपल्या अमूल्य सहकार्याची अपेक्षा आहे. आपल्या माध्यमातून आपल्या परिसरात ही 'संविधान गुण गौरव परिक्षा-२०२३' घेण्यासाठी आपले अमुल्य सहकार्य अपेक्षित आहे.

     *परीक्षेचे स्वरूप:-*

     *१) पात्रता:-* सदर परीक्षा लहान व मोठा अशा दोन गटांमध्ये घेण्यात येणार असून शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा 'लहान गट' व इ. १२ वी पुढील सर्व विद्यार्थ्यांचा 'मोठा गट' या स्वरूपात आहे. विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर सर्व नागरिकांचा समावेश मोठ्या गटात केला जाईल. वयाची अट नाही.

     *२) अभ्यासक्रम:-* सदर परीक्षा ही भारतीय राज्यघटनेसंदर्भातली सर्वसामान्य प्राथमिक माहिती, प्रास्ताविका व राज्यघटनेचा तात्विक व उद्देशांचा भाग असलेल्या पहिल्या पाच भागांवर (अनुच्छेद-१ ते ५१-क पर्यंत) आधारित असेल. सदर परीक्षेच्या अभ्यासासाठी नुरखॉं पठाण सर लिखित 'आपले संविधान... राज्यपद्धती नव्हे, तर जीवनपद्धती' या पुस्तकाची मूळ प्रत मोठ्या गटासाठी, तर याच पुस्तकाची 'संक्षिप्त प्रत' लहान गटासाठी देण्यात येईल. सोबतच संविधान क्षेत्रातील मान्यवरांचे ऑनलाईन मार्गदर्शन परीक्षार्थींना उपलब्ध करून देण्यात येईल.

     *३) परीक्षा शुल्क:-*  
     *• मोठा गट -* २६०/- रुपये (यात ३००/- रुपये किमतीचे 'आपले संविधान... राज्यपद्धती नव्हे, तर जीवनपद्धती' हे पुस्तक दिले जाईल.)
     पुस्तक पुर्णपणे ऐच्छिक असून जर स्पर्धकाला नको असेल, तर परिक्षा शुल्क या गटासाठी *५०/- रुपये* राहील.
     *• लहान गट -* १३०/- रुपये (यात १५०/- रुपये किमतीचे 'आपले संविधान... राज्यपद्धती नव्हे, तर जीवनपद्धती (संक्षिप्त)' हे पुस्तक दिले जाईल.) 
     पुस्तक पुर्णपणे ऐच्छिक असून जर स्पर्धकाला नको असेल, तर परिक्षा शुल्क या गटासाठी *३०/- रुपये* राहील.
     सदर परीक्षा फी मध्ये उत्तरपत्रिकेसह छापील प्रश्नपत्रिका, प्रमाणपत्र, पोस्टल खर्च, परीक्षा केंद्रावरील इतर खर्च, रोख बक्षिसे व चषकांचा समावेश आहे.

     *४) परिक्षेचे स्वरूप:-* सदर परीक्षा ही दोन्ही गटांसाठी १०० गुणांची असून त्यात ५० प्रश्नांचा समावेश केला जाईल. सदर परीक्षेसाठी एक तासाचा अवधी देण्यात येईल. पर्यवेक्षीय यंत्रणेच्या निरीक्षणाखाली ही परीक्षा शाळा, कॉलेज, विहार वा अन्य सोयीस्कर ठिकाणी आयोजित केली जाईल.
     उत्तरपत्रिका तपासण्याबाबत केंद्रप्रमुखांना 'आदर्श उत्तर पत्रिका' पाठवण्यात येईल. पेपर तपासून गुणानुक्रमानुसार यादी आयोजकांकडे पाठवून केंद्रप्रमुख सदर उत्तरपत्रिका संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षणासाठी तसेच कायम संग्रही ठेवण्यासाठी परत करतील.

     *५) परिक्षेचा निकाल:-* परिक्षेचा निकाल साधारणतः १ जानेवारी २०२४ पर्यंत जाहीर करण्यात येईल. संबंधित विजेत्यांना २५ जानेवारी २०२४ रोजी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल.

     *६) बक्षिसे:-*
     *• मोठा गट -*
      > प्रथम क्रमांक - ५०००/- व चषक
      > द्वितीय क्रमांक - ३०००/- व चषक 
      > तृतीय क्रमांक - २०००/- व चषक 
      > उत्तेजनार्थ - १०००/- व चषक.

     *• छोठा गट -*
      > प्रथम क्रमांक - ३०००/- व चषक
      > द्वितीय क्रमांक - २०००/- व चषक 
      > तृतीय क्रमांक - १०००/- व चषक 
      > उत्तेजनार्थ - ५००/- व चषक.

     सोबतच *सर्वाधिक परिक्षार्थी जमवणाऱ्या पहिल्या तीन केंद्रप्रमुखांचा देखील यथोचित सत्कार विशेष ट्रॉफी व 'आपले संविधान' हे पुस्तक देऊन करण्यात येणार आहे.* तसेच परिक्षेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते एक आकर्षक प्रमाणपत्र देण्यात येईल.

     *७) परीक्षेसाठी कालमर्यादा:-*
     • परीक्षेसाठी सहभागी होण्याची अंतिम तारीख - ३० सप्टेंबर २०२३.
     • परीक्षार्थींना पुस्तके पाठवणे -  परिक्षा फी जमा होताच.
     • तज्ज्ञ मार्गदर्शकाचे मार्गदर्शन - ऑनलाईन पद्धतीने देण्यात येईल.
     • प्रश्नपत्रिका केंद्रप्रमुखांना पाठवणे - २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत.
     •  प्रत्यक्ष परीक्षा - २५ नोव्हेंबर २०२३. 
     • उत्तर पत्रिका तपासणी - १० डिसेंबर २०२३ पर्यंत.
     • निकाल घोषणा - १ जानेवारी २०२४.
     • बक्षीस वितरण सोहळा - २५ जानेवारी २०२४.

     *८) आयोजकांचा स्तर:-* 
     • राज्य स्तर - संविधान गुण गौरव समिती.
     • जिल्हास्तर - एखादी सामाजिक संस्था इच्छुक असेल तर.
     • केंद्र स्तर - केंद्रप्रमुख.

     अशाप्रकारे सदर 'संविधान गुण गौरव परीक्षा-२०२३' ही अतिशय नियोजनबद्ध घेण्यात येणार असून या उपक्रमास आपले मोलाचे सहकार्य अपेक्षित आहे.
 संविधान गुण गौरव समिती-२०२३

*सहकार्यासाठी संपर्क:-*
    १) विलास पवार (मुंबई) - 9137662424.
    २) अझहर शहा, (येवला, नाशिक) - 9028108525.
    ३) नितीन घोपे (बुलढाणा) - 9921587937.
    ४) दिपरत्न निलंगेकर (लातूर) - 7722075999.
    ५) युवराज खोब्रागडे, (भंडारा) - 9923929145.
    ६) किशोर चव्हाण (बुलढाणा) - 9359197983.
    ७) सुशील गायकवाड (सातारा) - 9561394320.
 ८) नुरखॉं पठाण (गोरेगाव, रायगड) - 7276526268.

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: