Logo

अनुसुचित जाती व जमातीचे केंद्र व राज्याचे बजेट मध्ये वाटा आणि अमलबाजावणीसाचे वास्तव"

- 11/03/2022   Friday   2:20 pm
अनुसुचित जाती व जमातीचे  केंद्र व राज्याचे बजेट मध्ये वाटा आणि अमलबाजावणीसाचे वास्तव"

अनुसूचित जाती/जमातीच्या कल्याणासाठी "केंद्र व राज्याचे बजेट मध्ये वाटा आणि अमलबाजावणीसाचे वास्तव" यावर पुणेवव नाशिक येथे संविधान फौंडेशन चे

वतीने आम्ही presentation दिले. हा विषय अति महत्वाचा आहे. बजेट मध्ये पर्याप्त निधी दिला तर नवनवीन योजना करता येतील व योजनांचा लाभ ScSt कुटुंबांना मिळेल.

ज्याच्या साठी योजना आहेत त्यांना हा विषय समजावूनसांगण्याची व त्यांनी समजून घेण्याची घेण्याची गरज आहे.लोकांचे प्रबोधन आणि त्यांचा सहभाग यासाठी कार्यक्रमांचे आयोजन होणे आवश्यक आहे. 2012 पासून आम्ही हा विषय मांडत आहोत, उदासीनता आहे . तरी, मांडत राहिले पाहिजे, कधीतरी महत्व समजेल. हा उपक्रम संविधानिक हक्काचे रक्षणाचा आहे, राज्याला दिलेल्या मार्गदर्शक नीती निर्देशाचा आहे, शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकासाचा आहे. संविधान निर्माता बाबसाहेब यांची परिवर्तनाची चळवळ  गतिशील व मजबूत करणारा हा उपक्रम आहे. लक्ष द्यावे लागेल.इच्छुक व्यक्ती व संघटना आमच्याशी संपर्क साधू शकतात. आम्ही विषय सांगन्यासाठी तयार आहोत.

"14 एप्रिल -डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 14 तास अभ्यास -विकासाचा ध्यास" अशाप्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करून  त्यात, बजेट, शिष्यवृत्ती, फीमाफी, घरकुल, भूमिहीनांना जमीन, रोजगार,नोकऱ्या, उद्योग,  उपजीविका, शिक्षण, आरोग्य, वस्ती विकास, सुरक्षा, सन्मान  इत्यादी विषयावर चर्चासत्र आयोजित केल्यास , विकासाचा अजेंडा ,राबविला जाईल. युवक व महिलांचा सहभागमोठ्या प्रमाणात घेतला  पाहिजे.

 राज्याचे नवीन महिला धोरण-2022 चा ड्रफ्ट प्रसिद्ध झाला आहे. यात ScSt महिलांसाठी काय आहे हे ही समजून घेण्याची आवश्यकता आहे.  वरील, विषय घेऊन कार्यक्रम आयोजित केल्यास," अनुसूचित जाती जमाती च्या विकासाचे धोरण काय असावे" ह्याची दिशा निश्चित करण्यास मदत होऊ शकते.  जसे महिला विकासाचे धोरण आखले जाते तसेच ScSt ,भटके विमुक्त, ओबीसी विमाप्र, अल्पसंख्यांक यांच्याही विकासाचे धोरण सरकारने  तयार करावे. त्यासाठी प्रयत्न व्हावेत.

"14 तास अभ्यास विकासाचा ध्यास" हा उपक्रम सलग 14 तास , समाज कल्याण विभागात राज्यभर राबविला 2009-10 दोन वर्षे, मी संचालक/आयुक्त असताना. आता पुन्हा आयुक्तांनी हा उपक्रम सुरू करावा.जयंती किंवा धम्म परिषदेत हे विषय घेतल्यास चांगले होईल असे मला वाटते, म्हणून सुचविले. विचार करा.

इ झेड खोब्रागडे, भाप्रसे नि
संविधान फौंडेशन, नागपूर
M-9923756900
दि 9 मार्च2022.

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: