Logo

शोषित वंचितांच्या विकासाचे बजेट: चर्चासत्राची आवश्यकता इ झेड खोब्रागडे,भाप्रसे नि.

- 04/04/2022   Monday   8:36 am
शोषित वंचितांच्या विकासाचे बजेट: चर्चासत्राची आवश्यकता इ झेड खोब्रागडे,भाप्रसे नि.

राज्य सरकारने 2022-23 चे बजेट सादर केले. या बजेट मध्ये अनुसूचित जाती, जमाती, भटके- विमुक्त, विमाप्र, ओबोसी, अल्पसंख्यांक, पारधी समाज, आदिवासी- प्रीमिटीव्ह tribes, दुर्बल घटक , तसेच महिला व बालके इत्यादी च्या सर्वांगीन विकासासाठी/कल्याणासाठी काय दिले आहे हे जाणून घेणे या समाजाच्या कल्याणासाठी आवश्यक आहे.

संविधानाने राज्याला दिलेल्या नीती निर्देशाचे  आतापर्यंत काय झाले? स्वातंत्र्य च्या अमृत महोत्सवी वर्षात यावर मंथन होऊन मूल्यमापन झाले पाहिजे. लोकशाही प्रबळ करण्याचा हा प्रयत्न ठरेल. हे सर्व समाज घटकांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि विकासाचे धोरण ठरविले, सरकारने राबविण्यासाठी आग्रही राहिले तर नक्कीच चांगला बदल दिसेल. विकासाचा अजेंडा निश्चित करण्याची गरज आहे.

 तसेच, अनुसूचित जाती/ जमाती उपयोजनेसाठी स्वतंत्र कायदा करण्यासाठी  सरकारला भाग पाडावे लागेल. त्याशिवाय योजना प्रभावीपणे राबविल्या जाऊ शकणार नाहीत. गरजेवर आधारित योजना आणि अंमलबजावणीचे धोरण ठरविणे आवश्यक आहे.  शैक्षणिक -सामाजिक -आर्थिक विकासाचे  सर्वसमावेशक धोरण ठरले गेले पाहिजे. आज ते नाही.

हे लक्षात घेता, संविधान फौंडेशन चे पुढाकाराने व इतर संस्था व व्यक्ती यांचे सहकार्याने एक दिवसाचे चर्चासत्र प्रत्येक विभागाचे स्तरावर आयोजित करण्याचा आपला  प्रयत्न राहील. 
( नागपूर, अमरावती, औरंगाबाद ,नाशिक, पुणे आणि मुंबई- कोकण,). त्या त्या विभागातील जिल्ह्याचे समाज - प्रतिनिधी  सहभागी होतील. यासाठी इच्छुक असणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांनी चर्चासत्र आयोजनासाठी पुढाकार घ्यावा. चर्चासत्रातून :शोषित- वंचित-दुर्लक्षित-दुर्बल समाजाच्या विकासाचा अजेंडा: निश्चित करून यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करता येईल.
 दुसरा पर्याय, हे चर्चासत्र प्रथम राज्यस्तरिय घेता येईल आणि नंतर विभाग स्तरावर. यावर सूचना अपेक्षित आहेत.

हा प्रस्ताव आहे,  वरील समाज घटकांचे  प्रतिनिधी साठी. प्रतिसादाची अपेक्षा आहे. विभाग स्तरावर आयोजनाची जबाबदारी घेणाऱ्याच्या  स्थानिक व्यक्ती व संस्था च्या  प्रतिसादाची गरज आहे. त्यानुसार तारखा ठरविता येतील. 

 तसेही, संविधान फौंडेशन चे वतीने नागपूर, पुणे, नाशिक येथे बजेट वर सादरीकरण झाले आहे. आणि जसे जमेल तसे करण्याचा प्रयत्न आहे. मात्र,  सर्व समाजघटक मिळून हे  सर्वसमावेशक व्हावे ही अपेक्षा आहे त्यासाठी ही विनंती.  इच्छुकांनी कृपया  सूचना कराव्यात . कृपया,  माझे नंबर वर संपर्क साधावा, मेसेज करावा.

इ झेड खोब्रागडे,भाप्रसे नि.
संविधान फौंडेशन, नागपूर
M-9923756900
Dt  3  एप्रिल, 2022.

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: